KKR vs RCB Royal challengers bangalore record in green jersey amd2000 twitter
क्रीडा

KKR vs RCB,IPL 2024: RCB साठी ग्रीन जर्सी अनलकी? आतापर्यंत असा राहिलाय रेकॉर्ड

RCB RECORD In Green Jersey, KKR vs RCB: आज होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.दरम्यान कसा राहिलाय रेकॉर्ड? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज (२१ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. गेल्या वेळी जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. त्यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पराभवाची परतफेड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सलग दुसऱ्यांदा पराभूत करत गुणतालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ग्रीन जर्सी घालून उतरणार मैदानात..

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ग्रीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. ही जर्सी घालून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. यादरम्यान केवळ ४ सामने जिंकता आले आहेत. तर ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि १ सामना अनिर्णीत राहिला आहे.

या हंगामातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. तर ६ सामने गमवावे लागले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील शेवटचा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी शानदार कामगिरी करत १८६ धावा केल्या होत्या. या सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. त्याने ५९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार खेचत ही खेळी साकारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६.५ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार विजयी

Sweet Potato: रताळी म्हणजे सुपरफूड; हिवाळ्यात रताळी खाण्याचे फायदे

Relation Tips: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा…

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

SCROLL FOR NEXT