KKR vs RCB IPL 2024 Kolkata knight riders won by 1 run kolkata knight riders vs royal challengers bangalore amd2000 twitter
क्रीडा

KKR vs RCB, IPL 2024: शेवटच्या चेंडूवर RCB चा KKR कडून पराभव! प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३६ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शानदार कामगिरी करत १ धावेने विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला २२१ धावा करता आल्या.

कोलकाता नाईट रायडर्स सामने केल्या २२२ धावा..

कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. सलामीला फलंदाजी करण्यासाठी आलेल्या फिल सॉल्टने ४८ धावांचे योगदान दिले. शेवटी रिंकू सिंगने २४, आंद्रे रसलने २७ आणि रमनदीप सिंगने नाबाद २४ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २२२ धावांवर पोहचवली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून सलामीला आलेला विराट कोहली १८ तर कर्णधार फाफ डू प्लेसिस अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर विल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा डाव सांभाळला. विल जॅक्सने ३२ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने २३ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी होती. मात्र शेवटी कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारत विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT