KKR VS RCB Match IPL/twitter
Sports

KKR VS RCB Match: जेसन आणि राणाची झुंजार खेळी; कोलकाताचं आरसीबीला २०१ धावांचं आव्हान

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताने पाच गडी गमावून आरसीबीला २०१ धावांचे आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

kkr and rcb today match: रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि कोलकाता नाईट राईडर्स संघ यांच्यात आयपीएलचा ३६ वा सामना सुरू आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजींचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताने पाच गडी गमावून आरसीबीला २०१ धावांचे आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताची चांगली सुरुवात झाली. केकेआरने पॉवरप्लेमध्ये ६६ धावा कुटल्या. शाहबाजच्या सहा षटकानंतर २५ धावा झाल्या होत्या. कोलकाताला पहिला धक्का एन जगदीसनच्या रुपाने मिळाला.

जगदीसनने २९ चेंडूत २७ धावा कुटल्या. त्याने ४ चौकार लगावले. जगदीसननंतर जेसनही बाद झाला. जेसनने २९ चेंडूत ५९ धावा कुटल्या. जेसनने चार चौकार आणि ५ षटकार लगावले.

जेसन बाद झाल्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी संघाची कमान सांभाळली. दोघांनी ३५ धावांहून अधिक धावांची भागीदारी रचली. हसरंगाने अठराव्या षटकात कोलकाताचे दोन गडी बाद केले. १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर व्यंकटेश बाद झाला. व्यंकटेशने ३ चौकार आणि ४ षटकार लगावले.

सिराजने १९ व्या षटकात १५ धावा दिल्या. तसेच या षटकात सिराजला आंद्रे रसेलला बाद केले. रसेलने २ चेंडूत १ धाव केली. या आधी रिंकूने पहिल्या चेंडूत षटकार तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. केकेआरने २० षटकात २०० धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT