RCB Win Against KKR IPL Twitter
Sports

KKR Beat RCB: कोरबो लोढबो जितबो रे! आरसीबीचा धुव्वा उडवत कोलकाताने नोंदवला जबरदस्त विजय

RCB vs KKR : चक्रवर्तीने 3.4 षटकांत 15 धावांत चार बळी घेतले, तर सुयशने चार षटकांत 30 धावांत देत तीन विकेट मिळवल्या.

Chandrakant Jagtap

KKR Win Against RCB: कोलकाता नाईट रायडर्सने वरुण चक्रवर्तीच्या शानदार चार बळी आणि सुयश हॉलच्या तीन विकेट्सच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 123 धावांवर ऑलआऊट केले आणि चमकदार कामगिरी करत IPL 2023 चा नववा सामना जिकंला. चक्रवर्तीने 3.4 षटकांत 15 धावांत चार बळी घेतले, तर सुयशने चार षटकांत 30 धावांत देत तीन विकेट मिळवल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी मिळून चार षटकांत एकही विकेट न गमावता 42 धावा जोडल्या. पण पाचव्या षटकात आक्रमणात आलेल्या सुनील नरेनने तो कोलकाताचा सर्वात प्रभावशाली खेळाडू का आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

नरेनच्या षटकातील पाचव्या चेंडूवर कोहलीने टर्निंग बॉल टाकला आणि केकेआरला पहिली विकेट मिळाली. यानंतर पुढच्याच षटकात वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीचा सामना करताना कर्णधार फाप डू प्लेसिसही पॅव्हेलियनमध्ये परतला.

कोलकाताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आठव्या षटकात आक्रमणात आला आणि त्याने एकापाठोपाठ दोन विकेट घेतल्या. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चक्रवर्तीने ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला बाहेरच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर नवा फलंदाज हर्षल पटेल क्रीझवर आला आणि चौथ्या चेंडूवर ड्राईव्ह खेळण्याच्या लोभापायी पटेलच्या बॅठचा कट लागून तो बोल्ड झाला. (Latest Sports News)

तत्पूर्वी या सामन्यात कोलकाताची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. सुरुवातीलाच कोलाकाताचे झटपट तीन विकेट पडल्या. रहमानउल्ला गुरबाजने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु दुसरा बाजून विकेट पडतच गेल्या. त्यानंतर आलेल्या रिंकू सिंगने गुरबाजला उत्तम साथ दिली. परंतु गुरबाज 44 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने आक्रमक खेळी खेळत 29 चेंडूत 68 धावा ठोकल्या. (Latest IPL 2023 Updates)

दरम्यान रिंकू सिंगने देखील शेवटी गिअर बदलत मोठे शॉट खेळले. त्याने 33 चेंडूत 46 धावांची खेळी केली. गुरबाज, शार्दुल आणि रिंकूच्या आक्रमक खेळीच्या जोरावर कोलकाताने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 204 धावा केल्या. आरसीबीकडून डेव्हिड वीली आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन, तर सिराज, ब्रासवेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाईंदर पश्चिमेकडील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १८ जुगारी अटकेत

Pranjal Khewalkar: खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Tejaswini Lonari: नथीचा नखरा अन् नऊवारी साडी...; नवरात्री निमित्तानं तेजस्विनीचा मनमोहक लूक, पाहा PHOTO

EPFO News : PF खातेधारकांसाठी खुशखबर! एटीएममधून मिनिटांत काढता येणार पैसे, 'या' तारखेपासून सुरु होणार सेवा, जाणून घ्या

Fatty Liver: फॅटी लिव्हरची सुरुवातीची 5 लक्षणे कोणती? घरबसल्या करता येईल तपासणी; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

SCROLL FOR NEXT