मुबंई : वेस्ट इंडिजचा (West Indies) स्टार क्रिकेटर किरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 20 एप्रिल रोजी, कायरन पोलार्डने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची माहीती दिली. 34 वर्षीय पोलार्ड आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तो वेस्ट इंडिजच्या T20 आणि ODI संघाचा कर्णधारही आहे. त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Cricket) निवृत्ती घेतली असल्याचं जाहीर केलं आहे.
पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो टी-20 लीगमध्ये खळणार आहे. मात्र, आयपीएलच्या चालू हंगामात त्याला फारशी कामगिरी करता आलेली नाही. पण एकूण टी-20 मध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने 11 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय 300 हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत.
पोलार्डने त्याच्या निवृत्तीच्या मेसेजमध्ये लिहलय-
'मी सिलेक्टर्स, मॅनेजमेंट आणि कोच फिल सिमन्स यांचे आभार मानतो. या सर्वांनी माझी क्षमता पाहून माझ्यावरती विश्वास ठेवला. क्रिकेट वेस्ट इंडिजने माझ्यावर जो विश्वास दाखवला. त्यामुळे मी संघाचे नेतृत्व करु शकलो. क्रिकेट वेस्ट इंडिजच्या प्रमुखांचेही आभार मानतो. कर्णधारपदावर असताना त्यांनी जो पाठिंबा दिला, विश्वास दाखवला त्या बद्दल मी क्रिकेट वेस्ट इंडिजचे प्रमुख रिकी यांचे आभार मानतो" असं त्यांने रिटायरमेंटच्या मेसेजमध्ये लिहलं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.