kho kho world cup instagram
Sports

Kho- Kho World Cup: पुण्याचा वाघ नेपाळवर पडला भारी! प्रतीक वायकरचा दमदार खेळ, भारताची विजयी सलामी

India vs Nepal, Kho- Kho World Cup: खो- खो वर्ल्डकप स्पर्धेला दिल्लीत सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

खो खो वर्ल्डकप स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत. भारताचा सामना नेपाळविरूद्ध झाला. या सामन्यात भारताने नेपाळला ४२-३७ ने धूळ चारली आहे. यासह पहिल्या वहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार प्रतीक वायकरने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. भारताने दमदार सुरुवात करत पहिल्या ६० सेकंदातच नेपाळचं त्रिकुट फोडून काढलं. पहिल्या टर्नमध्ये १ मिनिट शिल्लक असताना भारताने १४ गुणांची मोठी आघाडी घेतली.

एकूण ७ मिनिटांचे ४ डाव खेळवले गेले. पहिल्या डावात भारताने २४ गुणांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात नेपाळने दमदार कमबॅक केले. डावाच्या शेवटी दोन्ही संघांचे गुण २४-२० असे होते.

भारतीय संघाने तिसऱ्या डावातही आक्रमण कायम ठेवले. ७ मिनिटात भारताने २० गुणांची कमाई करत गुणसंख्या ४२ वर पोहोचवली. नेपाळला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या डावात ४३ गुणांपर्यंत पोहोचायचं होतं.

या डावातही भारतीय खेळाडू चमकले. नेपाळला ३७ गुणांपर्यंत पोहोचता आलं. या शानदार कामगिरीसह भारताने हा सामना ४३-३७ ने आपल्या नावावर केला. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. तर नेपाळला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाचा पुढील सामना ब्राझीलसोबत होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. त्यामुळे नक्कीच भारतीय खेळाडूंचं मनोबल वाढलं असणार आहे. या स्पर्धेत एकूण ४ गट आहेत. या ४ गटात एकूण ५ संघ आहेत. त्यापैकी २ संघ उंपात्यपूर्वी फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mousse Cake Recipe: घरच्या घरी बनवा क्रीमी आणि चॉकलेटी मूस केक; बेकिंगशिवाय तयार होईल स्वादिष्ट डेझर्ट

Gold Price Today : ग्राहकांसाठी मोठा झटका! सोन्याच्या किमतीत १९,००० रुपयांची वाढ; सोन्याचे किंमतीने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड?

Organ donation: दरवर्षी 4-5 लाखांना अवयव प्रत्यारोपणाची गरज; 10 टक्क्यांहून कमी रुग्णांना लाभ, रुग्णालयाचा जनजागृतीसाठी पुढाकार

पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, लाठ्या-काठ्या अन् विटांनी बेदम मारलं, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल

Maharashtra News Live Update: पंढरपूर- नीरेच्या पाण्यासाठी सांगोल्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT