केविन पिटसनने उडवली भारतीय संघाची खिल्ली

 

Twitter/ @KP24

Sports

केविन पिटसनने उडवली भारतीय संघाची खिल्ली

पुन्हा एकदा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन चर्चेत आला आहे. पीटरसनने विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याविषयी बोलताना भारतीय संघाच्या तयारीवर जोरदार टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुन्हा एकदा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Pietersen) चर्चेत आला आहे. पीटरसनने विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम (WTC Finals) सामन्याविषयी बोलताना भारतीय संघाच्या तयारीवर जोरदार टीका केली आहे. बेटवेसाठी लिहीलेलल्या आपल्या लेखात पीटरसनने भारतीय संघ व्यवस्थापनावर खिल्ली उडविली आणि असे लिहिले की आयपीएल (IPL) खेळून भारतीय संघ कसोटी सामन्यासाठी तयारी करू शकत नाही. या माजी इंग्लिश क्रिकेटपटूने सांगितले की कसोटी सामन्यासाठी तयारी न करता मैदानावर उतरने ठिक नाही. पीटरसनने कबूल केले की भारतीय संघ (Team India) सराव सामना न खेळल्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पराभूत होईल.

भारतीय संघाने इंट्रा स्वाड सामना खेळला असला तरी त्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकादेखील खेळायची आहे. पिटरसन म्हणाला की न्यूझीलंडने अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळून या ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी चांगली तयारी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत किवी वेगवान गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. टीम साऊदीपासून मॅट हेन्रीपर्यंत त्यांनी अप्रतिम चांगली कामगिरी केली असून फलंदाजांना कसे रोखून ठेवायचे हे त्यांना ठाऊक आहे.

ऑगस्टपासून सुरू होणार्‍या इंग्लंड (England) दौर्‍यावर भारतीय संघाला 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पीटरसनला भीती आहे की चांगली तयारी नसल्यामुळे भारतीय संघ कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात किवी संघापेक्षा कमकुवत ठरेल, तर फलंदाजांची कामगिरीही घसरेल. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने शानदार प्रदर्शन केले असून कसोटी मालिका 1-0 ने जिंकण्यात यश आले आहे. 22 वर्षांनंतर किवी संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यामुळे किवी संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. इतकेच नाही तर न्यूझीलंडचा संघ सध्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, अपघातामध्ये चौघेजण गंभीर जखमी

Roti Making Tips : पोळपाट- लाटणं न वापरता बनवा गोल चपाती, 'ही' आहे युनिक ट्रिक

स्वच्छ आणि निर्मळ मन! कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये, काकूंनी जे केले ते ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान| VIDEO

Success Story: स्वप्नपूर्ती! अवघ्या २१ व्या वर्षी मिळवली अमेरिकेत २६ लाख पॅकेजची नोकरी; शेतकऱ्याच्या लेकाचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

मध्य प्रदेशातील गुलाबी थंडी, गाव झोपेत अन् छापेमारीचा धडका, पुणे पोलिसांचे "ऑपरेशन उमरती" यशस्वी

SCROLL FOR NEXT