Kaviya Maran Angry Viral Video Social Media  Saam TV
क्रीडा

Kaviya Maran Video : हट यार! भर मैदानात कॅमेरामनवर भडकली सनरायजर्स हैदाबादची मालकीन; VIDEO तुफान व्हायरल

Satish Daud

Kaviya Maran Viral Video : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ वा हंगाम जोमात सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात एकापेक्षा एक असे रंगदार सामने पाहायला मिळत आहे. रविवारी आयपीएलमध्ये सनराईज हैदाराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात अतिशय रोमांचक सामना झाला. या सामन्यात हैदराबादने पंजाबला ८ विकेट्सने पराभूत केलं. (Latest Marathi News)

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने हैदाराबादला विजयासाठी १४४ धावांचे आव्हान दिले होते. हैदाराबादने हे आव्हान १७ चेंडू आणि ८ विकेट्स राखत पूर्ण केलं. राहुल त्रिपाठी हा हैदाराबादच्या विजयाचा हिरो ठरला त्याने ४८ चेंडूत ७४ धावा कुटल्या. यंदाच्या हंगामात हैदराबादचा हा पहिलाच विजय आहे. (Breaking Marathi News)

काव्या मारनचा व्हिडीओ व्हायरल

सलग दोन सामने गमावल्यानंतर हैदराबादने आपल्या घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवला आहे. दरम्यान, या सामन्यातील सनराईज हैदराबादची मालकीन काव्या मारनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान  व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओत काव्या मारन थेट कॅमेरामॅनवर भडकली असल्याचं सांगितलं जातंय.

हा संपूर्ण प्रकार सामन्यातील १९ व्या षटकात घडला आहे. पंजाब किंग्जची फलंदाजी सुरू असताना कॅमेरामनने सनरायझर्स हैद्राबाद संघाची मालकीन काव्या मारनला मोठ्या स्क्रीनवर दाखवलं. पण काव्याला कॅमेरामनची ही कृती अजिबात आवडली नाही. काव्याने कॅमेरामनवर संताप व्यक्त करत ‘हट रे’ अशा शब्दात प्रतिक्रिया दिली.

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारन ही सन ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. सनराईज हैदराबादच्या प्रत्येक सामन्यासाठी ती मैदानावर हजर असते. यापूर्वी देखील काव्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोलदेखील केलंय. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यावेळीही जेव्हा कॅमेरामनने कॅमेरा काव्याकडे फिरवला तेव्हा तिने हट रे असा इशारा केला. याचा व्हिडीओ आता ट्विटर युजर्स शेअर करत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT