Jasprit Bumrah
Jasprit Bumrah  Saam Tv
क्रीडा | IPL

Jasprit Bumrah Injury: जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट! आता थेट IPL खेळणार

Saam TV News

Jasprit Bumrah Injury Update: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर आहे.

भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह भारतीय संघासाठी पुनरागमन केव्हा करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आता मोठी माहिती समोर आली आहे.(Latest Sports Updates)

या वर्षाच्या शेवटी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज असणार आहे. त्यामुळे त्याचा वर्कलोड कमी करण्यासाठी बीसीसीआय त्याला जास्तीत जास्त विश्रांती देण्याच्या प्रयत्नात आहे.

बॉर्डर -गावसकर ट्रॉफीतील उर्वरित २ कसोटी सामन्यांसाठी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत देखील त्याची निवड करण्यात आली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहला अजूनही आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेट मिळालेलं नाहीये. त्याला काही सराव सामने खेळायचे होते, मात्र त्याला अनुमती दिली गेली नव्हती.

इनसाईड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराह आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने खेळणार आहे. बीसीसीआय त्याचा वर्ल्ड लोड मॅनेज करण्याच्या प्रयत्नात आहे. यासह बीसीसीआय बुमराहच्या फिटनेसवरही लक्ष ठेऊन आहे.

जसप्रीत बुमराह हा इंग्लंड दौऱ्यावर दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यानंतर त्याला आशिया चषक आणि आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करता आले नव्हते.

जसप्रीत बुमराहचं कमबॅक करण्यासाठी बीसीसीआयने ही रणनीती आखली आहे. जर ही रणनीती यशस्वी ठरली तर नक्कीच भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल. मात्र हा प्रयत्न फसला तर आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेतूनही जसप्रीत बुमराह बाहेर होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT