Jasprit Bumrah News twitter
Sports

Jasprit Bumrah : एक नंबर! जसप्रीत बुमराहनं इतिहास रचला; बॉक्सिंग डे टेस्टआधीच केला अनोखा रेकॉर्ड

Jasprit Bumrah News : जसप्रीत बुमराहने अनोखा इतिहास रचला आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या एक दिवस आधीच जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डनंतर त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारताचा आणखी एक संघ बॉक्सिंग डे टेस्टसाठी सज्ज झाला आहे. या सामन्याआधीच जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड केला आहे. भारताचा जलद गोलंदाज कर्णधार जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध मेलबर्नमध्ये आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिप सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करत ९ विकेट घेतले होते. त्यामुळे कसोटीच्या इतिहासात सर्वात रेटिंग पॉइंट्स मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. c

जसप्रित बुमराहने गाबा टेस्टमध्ये ९४ धावा देऊन ९ विकेटसहित रेटिंग पॉइंटमध्ये १४ अंकाची भर घातली. त्यामुळे त्याचे रेटिंग पॉइंट्स ९०४ झाले आहेत. काही दिवसांपूर्वी निवृत्ती जाहीर करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने डिसेंबर २०१६ साली मुंबईत इंग्लंडच्या विरोधात चौथ्या टेस्टनंतर रेटिंग मिळवले होते. सीरीजमध्ये आतापर्यंत बुमराहने २१ विकेट बाद केले आहेत. आर अश्विनने रँकिंगमध्ये ४८ रेटिंग पॉइंट्स अधिक मिळवले होते. सध्या कागिसो रबाडा (८५६) आणि जोश हेजलवुड (८५२) अनुक्रमे दुसरे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

यादीत मोहम्मद सिराज एका अंकाने आघाडी घेऊन २४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर तर ट्रेविस हेडचं नाव देखील टॉप १०० मध्ये पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कर्णधार पॅट कमिन्स ८२२ रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. तर निवृत्ती घोषित करणारा रविचंद्रन आश्विन हा ७८९ पॉइंट्ससह पाचव्या क्रमाकांवर आहे. रविंद्र जडेजा हा चौथ्या क्रमांकावरून १० व्या नंबरवर पोहोचला आहे. मिचेल स्टार्क ११ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर नाथन लायन हा ७ व्या क्रमाकांवर पोहोचला आहे. मॅट हेनरी सहाव्या , श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या हा ८ व्या क्रमाकांवर तर पाकिस्तानचा नोवान अली ९ व्या क्रमाकांवर पोहोचला आहे.

सर्वात वेगाने टेस्ट रेटिंग पॉइंट मिळवणाऱ्या यादीत टॉप ५ मध्ये कोण?

इंग्लंडच्या सिडनीत बर्न्सच्या नावावर जागतिक्र विक्रम आहे. १९१४ साली त्याने ९३२ पॉइंट्स मिळवले होते. तर दुसऱ्या क्रमाकांवर इंग्लंडचा जॉर्ज लोहमॅन ९३१ पॉइंट्स मिळवले होते. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान हा ९२२ पॉइंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.श्रीलंकेचा मुथैया मुरलीधर ९२० रेटिंग पॉइंट्ससह चौथ्या क्रमाकांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्ग्रा हा ९१४ पॉइंट्ससह ५ व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT