अहमदाहबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तान संघातील फलंदाज मोहम्मद रिजवानला जसप्रीत बुमराहने बाद करत माघारी धाडले आहे. त्याची दांडी गुल केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बुमराहने घेतली रिजवानची विकेट
भारतीय संघान गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर शफिक आणि इमाम उल हक गोलंदाजीला आले होते. हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान ही जोडी मैदानावर जमली होती.
दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे भारतीय गोलंदाज बॅकफुटवर गेले होते. मात्र त्यानंतर मोहम्मद सिराजने बाबर आझमला बाद करत भारतीय संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला.बाबर आझम ५० धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)
भारतीय संघाकडून ३४ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने मोहम्मद रिजवानची दांडी गुल केली आहे. भन्नाट गोलंदाजी करणाऱ्या बुमराहने शेवटच्या चेंडूवर बोटं फिरवली.
ऑफ साईडच्या बाहेर टाकलेला हा चेंडू टप्पा पडताच इतका फिरला की, मोहम्मद रिजवानला काही कळायच्या आत मोहम्मद रिजवानची दांडी उडवून गेला.
हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत आला आणि मधल्या फळीला जाऊन धडकला. या अप्रतिम चेंडूच्या जोरावर भारतीय संघाने सहावी विकेट मिळवली. मोहम्मद रिजवान ६९ चेंडूंमध्ये ४९ धावांची खेळी करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार मारले.