Jasprit Bumrah Trent Boult x
Sports

Bumrah Boult Video : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार वाढली! दोन मित्रांचे रियुनियन; आता खरी मजा येणार

Jasprit Bumrah Trent Boult : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे. जसप्रीत बुमराह आयपीएल खेळण्यासाठी परतला आहे. याच दरम्यान बुमराह आणि बोल्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना उद्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्याआधी मुंबईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. उद्याच्या बंगळुरू विरुद्धच्या सामन्यामध्ये तो सामील होईल असेही म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मुंबई इंडियन्सच्या संघाने चाहत्यांना गोड बातमी दिली. या व्हिडीओमध्ये बुमराहची पत्नी संजना आणि मुलगा अंगददेखील होता. या व्हिडीओनंतर आणखी एक व्हिडीओ मुंबईच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह एकत्र पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओच्या सुरुवातीला ट्रेंट बोल्ट बुमराहकडे स्माईल करत असल्याचे दिसते. त्यानंतर बोल्ट बुमराहला भेटायला जातो. बुमराहला पाहून बोल्ट 'तुला पाहून खूप आनंद झाला, कसा आहेस?' असे म्हणतो. बुमराह बोल्टला मिठी मारतो आणि दुखापतीतून बरा झाल्याचे सांगताना 'मला खेळायची संधी मिळाली आहे', असे जसप्रीत बुमराह म्हणतो. सोशल मीडियावर बोल्ट आणि बुमराहच्या या व्हिडीओची चर्चा पाहायला मिळत आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान पाचव्या कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या भागाला दुखापत झाली होती. त्यामुळे बुमराह मैदानाबाहेर गेला होता. त्या सामन्यानंतर बुमराहच्या दुखापतीवर उपचार सुरु झाले. या दुखापत प्रकरणामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होता आले नाही. आयपीएल २०२५ मध्ये तो खेळताना दिसेल की नाही अशी चिंता वाटत होती. पण आता ही चिंता दूर झाली आहे. जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी परतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT