jasprit bumrah, rohit sharma, virat kohli  saam tv
Sports

Jasprit Bumrah Record: कमबॅकनंतर पहिल्याच सामन्यात बुमराहचा मोठा रेकॉर्ड; रोहित अन् विराटसारख्या दिग्गजांच्या यादीत प्रवेश

Jasprit Bumrah New Record In T20I: पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराहने रोहित शर्मा आणि विराटसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादित प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

India vs Ireland 1st T20I News In Marathi:

भारतीय संघाने पहिल्या टी -२० सामन्यात आयर्लंडवर २ धावांनी विजय मिळवला आहे. पावसामुळे व्यत्यय आलेल्या या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. यासह त्याची विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत एन्ट्री झाली आहे.

जसप्रीत बुमराह या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करतोय. पहिल्याच सामन्यात त्याने केलेल्या दमदार कामगिरीचा बळावर त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे टी -२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या मोजक्याच खेळाडूंच्या यादीत आता बुमराहचं देखील नाव घेतलं जाणार आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने ५ वेळेस हा कारनामा केला आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने ३ आणि सुरेश रैना, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे. (Latest sports udpates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आयर्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद १३९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार जसप्रीत बुमराहने ४ षटक २४ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने देखील प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंगने १ गडी बाद केला.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १४० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला केवळ ६.५ षटके खेळायला मिळाली. यादरम्यान भारतीय संघाने २ गडी बाद ४७ धावा केल्या होत्या.

डकवर्थ लुईस नियमानुसार सामना थांबला त्यावेळी भारतीय संघ २ धावांनी पुढे होता. त्यामुळे भारतीय संघाला २ धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसई-विरारमधील तलावांमध्ये पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमुळे आंदोलन

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारू विक्रीबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT