Jasprit Bumrah Injury Update Saam Tv
Sports

Jasprit Bumrah : मुंबईला धक्का बसणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बुमराह आयपीएललाही मुकणार? रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

Jasprit Bumrah IPL 2025 : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी झाला नाही. आता बुमराह आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Yash Shirke

Jasprit Bumrah Injury : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे बुमराहला घरी थांबून आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. यामुळेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये बुमराह खेळताना दिसला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बुमराह आयपीएललाही मुकणार असल्याचे म्हटले जात होते.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, दुखापतींमुळे जसप्रीत बुमराह आयपीएल २०२५ च्या सुरुवातीला मैदानाबाहेर दिसेल. सध्या बुमराह बेंगळुरूमध्ये आहे. बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये उपचार घेत आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी फिट नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ ला सुरुवातीचे एक ते दोन आठवडे मैदानाच्या बाहेर असणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराहच्या दुखापतीमध्ये सुधारणा होत आहे. त्याने सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये त्याने गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या कालावधीत गोलंदाजी करणे त्याला शक्य होणार नाही. एप्रिल महिन्यात तो फिट होऊन मैदानामध्ये परत येऊ शकतो.

जसप्रीत बुमराह हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मैदानात खेळण्यासाठी येऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ३ ते ४ सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही असे म्हटले जात आहे. जसप्रीत बुमराहच्या फिटनेसची सर्व चाहत्यांनी खूप काळजी लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT