Jason Holder Retirement saam tv
Sports

Cricket News : १० वर्षांची कारकीर्द, २२३७ धावा, १५९ विकेट, ८६ सामन्यांत देशाचं नेतृत्व; माजी कर्णधाराची वनडेतून अचानक निवृत्ती

Jason Holder Retirement From ODI Cricket : वेस्ट इंडीजचा दिग्गज ऑलराउंडर आणि माजी कर्णधार जेसन होल्डर यानं वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यानं ही माहिती दिली.

Nandkumar Joshi

उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू, दोन हजारांहून अधिक धावा आणि दीडशेहून अधिक विकेट घेणाऱ्या माजी कर्णधारानं वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वेस्ट इंडिजचा मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यानं होल्डरच्या निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वनडेतून निवृत्त झाला असला तरी होल्डर हा कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे. मात्र, होल्डर यानं स्वतः याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

जेसन होल्डरला वेस्ट इंडिजच्या प्लानिंगमध्ये स्थान मिळणार आहे का? असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला. त्यावर मुख्य प्रशिक्षक सॅमी यानं ही माहिती दिली. होल्डर हा अजूनही कसोटी क्रिकेटचा भाग आहे. वनडेमधून त्यानं निवृत्ती घेतली आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यास त्याची तयारी आहे, असे सॅमी यानं सांगितलं. होल्डर हा सध्या फ्रेंचाइजी क्रिकेट खेळत आहे.

होल्डरची वनडे कारकीर्द

जेसन होल्डर अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. २०१३ ते २०२३ अशी त्याची दहा वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आहे. वनडे कारकीर्दीत तो एकूण १३८ सामने खेळला आहे. त्यात त्यानं २४ हून अधिकच्या सरासरीने २२३७ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या ९९ आहे. होल्डरने आपल्या १० वर्षांच्या कारकीर्दीत एकदाही तिहेरी धावसंख्या केली नाही. त्याच्या नावावर ११ अर्धशतके आहेत.

८६ सामन्यांत वनडे संघाचे कर्णधारपद भूषवले

फलंदाजीसह गोलंदाजीतही होल्डरने आपला प्रभाव पाडला आहे. वनडे कारकीर्दीत त्याने एकूण १५९ विकेट घेतल्या असून, ३६.९६ त्याची सरासरी आहे. त्यानं दोन वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. फलंदाजी-गोलंदाजीत तर चांगली कामगिरी आहेच, पण तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. वनडे कारकीर्दीत त्याने ६५ झेल पकडले आहेत. ८६ वनडे सामन्यांत त्याने संघाचे नेतृत्व केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कथोरे गटाचं वर्चस्व

Bhootam Bhayam: नशिब बदलणारा 'परीस' की नव्या संकटांची सुरुवात? 'भूतम् भयम्'चा दमदार ट्रेलर रिलीज

BJP आमदाराच्या नावाचं बनावट लेटरहेड; मंजूर कामाऐवजी काढला नव्या कामांचा GR, शिंदे सेनेच्या माजी आमदाराचा कारनामा

शाळेच्या सहलीला गेले, ५५-६० विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाण्यातील घटनेने खळबळ, पालकांमध्ये भीती

Akkha Masoor Masala Recipe: घरीच बनवा हॉटेलस्टाईल स्वादिष्ट अख्खा मसूर मसाला; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT