Ishan kishan  Saam tv
Sports

Ishan kishan : हलक्यात घेऊ नका! मुंबईने सोडलं, हैदराबादने उचललं; ४५ बॉलमध्ये शतक ठोकत ईशानने राजस्थानला फोडलं

Ishan kishan latest News : ईशान किशानने राजस्थान रॉयल्स विरोधात दमदार खेळी खेळली आहे. ईशानने राजस्थान विरोधात ४५ चेंडूत शतक पूर्ण केलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : सनरायझर्स हैदराबादच्या ईशान किशनने रविवारी राजस्थान रॉयल्सच्या विरोधात धुव्वादार खेळी खेळली आहे. आयपीएल सीजनच्या पहिल्या सामन्यात ईशान किशानने पहिलं धमाकेदार शतक ठोकलं आहे. ईशानने ४५ चेंडूत शतक पूर्ण केलं आहे.

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात किशनने २५ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर जोरदार फटकेबाजीला सुरुवात करत ४५ चेंडूत शतक पूर्ण केलं. आयपीएलच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने ईशान किशनने ११.२५ कोटींना खरेदी केलं.

सनरायझर्स हैदराबादच्या सर्व खेळाडूंनी धुव्वादार फलंदाजी केली. अभिषेक शर्माने ११ चेंडूत २४, ट्रेविस हेडने ३१ चेंडूत ६७, नितीश कुमारने १५ चेंडूत ३० धावांची खेळी खेळली. यंदा किशनला आयपीएल २०२५ साठी मुंबई इंडियन्सने रिलीज केलं.

राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने पहिल्या विकेटसाठी ४५ धावा कुटल्या. चौथ्या षटकात महीश तीक्षणाने अभिषेक शर्माला बाद केलं. त्यानंतर हेडच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. हेडने ३१ बॉलमध्ये ६७ धावा कुटल्या.

नीतीश कुमारने १५ चेंडूत ३० धावा कुटल्या. तर क्लासनने १४ चेंडूत ३४ धावा कुटल्या. सनरायजर्स हैदराबादने २० षटकात सहा गडी गमावून २८६ धावा कुटल्या. ईशानने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १०६ धावा कुटल्या. सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला २८७ धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. हैदराबादच्या आव्हानाचा राजस्थानचा संघ कसा पाठलाग करतो, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

SCROLL FOR NEXT