Ishan kishan and shreyas Iyer removed from BCCI central contract list will they play again for team India  yandex
क्रीडा

BCCI Central Contract: इशान किशन - श्रेयस अय्यर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर! आता पुन्हा टीम इंडियाकडून खेळू शकणार का?

Ankush Dhavre

Ishan Kishan- Shreyas Iyer Removed From Central Contract:

भारतीय संघातील फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून (Central Contract) बाहेर केलं आहे. बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून इशान आणि श्रेयस अय्यरसह आणखी काही प्रमुख खेळाडूंना बाहेर केलं आहे. दरम्यान अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केल्यानंतर हे खेळाडू पुन्हा भारतीय संघासाठी कधीच खेळू शकणार नाहीत? हे दोघं कमबॅक केव्हा करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आलेल्या खेळाडूंना बीसीसीआय एक ठरलेली रक्कम वेतन म्हणून देते. म्हणजे या खेळाडूंना मॅच फीसह सेंट्रल कॉन्ट्रॅक्टनुसार ठरलेली रक्कम मिळत असते. मात्र ज्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश नसतो अशा खेळाडूंना केवळ मॅच फी दिली जाते. हे खेळाडू सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये नसले तरी ते भारतीय संघासाठी खेळू शकतात.

असे अनेक खेळाडू आहेत जे बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हते तरीदेखील भारतीय संघाकडून खेळत होते. अजिंक्य रहाणेला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्यात आलं आहे. तरीदेखील तो वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्यासाठी उतरला होता. यावरून हे स्पष्ट आहे की, खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केन गेलं असलं तरीदेखील ते भारतीय संघाकडून खेळू शकतात. (Cricket news marathi)

वर्ल्डकपमध्ये श्रेयसची दमदार कामगिरी..

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत इशान किशनला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तर दुसरीकडे श्रेयस अय्यर सर्व सामने खेळला. श्रेयस अय्यरची बॅट या स्पर्धेत चांगलीच तळपली. त्याने या स्पर्धेत ५०० हून अधिक धावा केल्या. श्रेयस अय्यरला सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT