जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या शानदार गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.
मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६ गडी बाद केले आहेत. दरम्यान हा सामना सुरू असताना समालोचकाने त्याच्यावर वंशवादी टीका केली. सध्या हे प्रकरण तुफान चर्चेत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू असताना, एका प्रसिद्ध महिला समालोचकाने बुमराहचा प्राईमेट असा उल्लेख केला. या शब्दाचा अर्थ नरवानर असा होतो. या कमेंटनंतर पुन्हा एकदा मंकी गेट प्रकरणाची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
या कसोटी सामन्यात एकदा जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर भारी पडला. या डावात गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक ६ गडी बाद करण्याचा कारनामा केला. या कसोटीतील दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सेशनमध्ये त्याने २ गडी बाद केले होते.
त्यानंतर समालोचन करत असलेल्या ब्रेट लीने त्याच्या कौतुकाचे पुल बांधले. त्यावेळी महिला समालोचकाने असं काही म्हटलं, जे नव्या वादाला कारणीभूत ठरलं आहे. ती म्हणाली, ' जसप्रीत बुमराह भारताचा MVP आहे. मोस्ट valuable प्राईमेट प्लेअर आहे. या सामन्यातही त्याने आपली छाप सोडली आहे.'
आता समालोचकाने माफी मागितली आहे. तिने स्पष्टीकरण देत म्हटलय की, तिचा उद्देश केवळ त्याचा आदर करणं हाच होता. ती माफी मागताना म्हणाली की, ' काल समालोचक करत असताना मी एका शब्दाचा वापर केला होता, त्याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. मी केलेल्या कमेंटमुळे ज्यांची मनं दुखावली गेली असतील त्यांची मी माफी मागते. मी इतरांचा खूप आदर करतो.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.