National Sports Of India saam tv
Sports

National Sports Day 2023: काय सांगता? हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ नाही?

National Sports Of India: तुम्हाला माहितेय का,हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही.

Ankush Dhavre

>जयेश सावंत

Is Hockey National Game Of India : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? असं म्हटलं की हॉकी या खेळाचचं नाव समोर येतं. पण तुम्हाला माहितेय का,हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. खरं तर भारतीय सरकारकडून कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जाच देण्यात आला नाही आहे. पण हे कसं शक्य आहे? जाणून घ्या.

१९७० पर्यंत हॉकी हा एकच असा खेळ होता जो क्रिडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत होता. हॉकीमध्ये भारताने आतापर्यंत ऑलिंपिकमध्ये आठ सुवर्ण पदके तर एक विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळेच सर्वांना हॉकी हाच राष्ट्रीय खेळ आहे असा संभ्रम निर्माण झाला असावा.

आता प्रश्न असा पडतो की हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही याचा पत्ता कसा लागला ? तर २०२१ मध्ये धुळ्यातील एका शिक्षकानं दाखल केलेल्या RTI वर मंत्रालयाकडून मिळालेल्या उत्तरामध्ये सारं काही दडलं आहे. यामध्ये सरकारने कोणत्याच खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून जाहीर केलेले नाही. सरकारला सर्व खेळांचा प्रसार करायचा आहे असं उत्तर मिळाल्याने यामागचा खुलासा झाला आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिवस...

भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी खेळाडू आणि देशवासीयांमध्ये जागरूकता निर्माण केल्याचं काम केलं जातं. (Latest sports updates)

खेळाचं महत्व आता वाढत चाललं आहे. भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्येही दमदार खेळ करत आहेत. युवा पिढी अधिकाअधिक खेळांकडे आकर्षित व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिनी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

तसेच क्रीडा क्षेत्रात पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देखील दिले जातात. ज्यात शिवछत्रपती पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT