IPL retention list saam tv
क्रीडा

IPL Retention 2025 : मुंबई इंडियन्सनं कुणाला रिटेन केलं? रोहित शर्मा, हार्दिक पंड्याचं काय झालं? पाहा सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी

IPL Retention 2025 List : आयपीएल २०२५ च्या मेगालिलावाआधी १० संघांनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे दिली आहे. मुंबई इंडियन्सनं कुणाला रिटेन केलं? हार्दिक पंड्या, रोहित शर्माचं काय झालं?

Nandkumar Joshi

आयपीएल २०२५ साठीच्या मेगालिलावाआधी आज, गुरुवारी सर्व फ्रेंचाइजींनी आपल्या रिटेन खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. ती यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. अनेक संघांनी कठोर निर्णय घेतले आहेत. संघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून असलेल्या खेळाडूंना रीलीज केलं आहे. तर काही संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना कायम ठेवलं आहे.

मुंबई इंडियन्सनं हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन केलं आहे. बुमराहला १८ कोटी रुपये मोजून आपल्या संघात कायम ठेवलं आहे. मात्र, ही रक्कम रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यापेक्षा जास्त आहे.

मुंबई इंडियन्स

हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी), जसप्रीत बुमराह (१८ कोटी), तिलक वर्मा (८ कोटी)

कोलकाता नाइट रायडर्स

रिंकू सिंह (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी), रमनदीप सिंह (४ कोटी)

चेन्नई सुपर किंग्ज

ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथीशा पथिराना (१३ कोटी), शिवम दुबे (१२ कोटी), रविंद्र जडेजा (१८ कोटी), एमएस धोनी (४ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

विराट कोहली (२१ कोटी), रजत पाटीदार (११ कोटी), यश दयाल (५ कोटी)

पंजाब किंग्ज

शशांक सिंह (५.५ कोटी), प्रभासिमरन सिंह (४ कोटी)

दिल्ली कॅपिटल्स

कुलदीप यादव (१३.२५ कोटी), अक्षर पटेल (१६.५० कोटी), ट्रिस्टन स्टब्ज (१० कोटी), अभिषेक पोरेल (४ कोटी)

लखनऊ सुपर जायंट्स

निकोलस पुरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयांक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी), आयुष बदोनी (४ कोटी)

राजस्थान रॉयल्स

संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जयस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), शिमरन हेटमायर (११ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), संदीप शर्मा (४ कोटी)

सनरायजर्स हैदराबाद

पॅट कमिन्स (१८ कोटी), अभिषेक शर्मा (१४ कोटी), नितीश कुमार (६ कोटी), हेनरिक क्लासेन (२३ कोटी), ट्रेविस हेड (१४ कोटी)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा फुलप्रुफ प्लॅन, मविआला बसणार फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला मोठा दिलासा; Trumpet च्या चिन्हाचं भाषांत्तर 'ट्रम्पेट' च

Prakash Ambedkar: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांची प्रकृती खालवली; रक्तात आढळली गाठ

Adulterated Sweets: ऐन सणासुदीत भेसळीचा काळाबाजार; बाजारात विकला जातोय नकली खवा?

Maharashtra News Live Updates: कल्याण पश्चिम विधानसभेतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखाेर उमेदवार अरविंद मोरे यांची माघार

SCROLL FOR NEXT