ipl over now t20 world cup will kick start from 1 june know team india schedule cricket news in marathi amd2000 twitter
क्रीडा

T20 World Cup 2024: IPL संपली आता रंगणार टी-२० वर्ल्डकपचा थरार! केव्हा होणार टीम इंडियाचे सामने?

Team India T20 World Cup 2024 Schedule: आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर आता टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान कधी होणार भारतीय संघाचे सामने? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारत तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. यासह ही स्पर्धा समाप्त झाली आहे. आता साऱ्यांचं लक्ष टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेवर असणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच भारतीय खेळाडू अमेरिकेत दाखल झाले आहेत.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेची सुरुवात १ जूनपासून होणार आहे. मात्र वेळेचं अंतर असल्यामुळे ही स्पर्धा भारतात २ जूनपासून सुरू होईल. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. ज्यात भारतीय संघासह कॅनडा, पाकिस्तान, अमेरिका आणि आयर्लंड संघाचा समावेश आहे.

भारतीय संघाच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी बीसीसीआयने ३० एप्रिल रोजी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यासह ४ राखीव खेळाडूंच्या नावाची देखील घोषणा केली. या संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT