Hardik Pandya looks on during Mumbai Indians’ defeat as criticism over his captaincy grows. saam tv
Sports

IPL: हार्दिकच्या चुकांमुळे मुंबई इंडियन्सच्या नशिबी पराभव; माजी क्रिकेटरची नेतृत्त्वावर टीका

Aakash Chopra Slams MI Captaincy : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकची खराब कामगिरी कायम चालू आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या या सामन्यात मुंबईचा दारूण पराभव झाला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने दोन मोठ्या चुका केल्या.

Bharat Jadhav

  • मुंबई इंडियन्सचा आणखी एक पराभव

  • हार्दिक पांड्याच्या निर्णयांवर टीका

  • आकाश चोप्राचा थेट आरोप

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सला सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सीएसकेनं मुंबईचा ८ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे अत्यंत कठीण झालंय. यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वावर टीका केली जातेय. आता माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने हार्दिक पांड्याच्या दोन मोठ्या चुकांमुळे मुंबई इंडियन्सच्या पराभव झाला असं म्हटलंय.

हार्दिक पांड्या कुठे चुकला?

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर मुंबई इंडियन्सच्या संघरचनेवर टीका केली. मुंबई इंडियन्सची फलंदाजीची फळी सातव्या क्रमांकावर संपत असल्याबाबतही त्याने नाराजी व्यक्त केली आहे. हार्दिकने बुमराहला फक्त तीन षटके टाकायला सांगितली. त्याच्या मते, मधल्या षटकांमध्ये जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गझनफर यांना गोलंदाजीसाठी आणायला हवे होते, असं आकाश चोप्रा म्हणाला आहे.

"तुमची फलंदाजी सातव्या क्रमांकावर संपली होती, त्यानंतर कोणीच फलंदाज नव्हता. मागच्या सामन्यात तुम्ही कोणत्याही प्रभावी खेळाडूंचा वापर केला नाही. या सामन्यात तुमच्या मुख्य गोलंदाजांची षटके शिल्लक होती. तुम्ही त्यांना गोलंदाजीसाठी आणले, तोपर्यंत सामना संपलेला होता", असं आकाश चोप्रा म्हणाला.

'MI प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही'

आकाश चोप्राने दावा केला आहे की, MI आता प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाही. "मुंबई इंडियन्स अजूनही पात्र ठरू शकतात परंतु , ज्या प्रकारे ते खेळत आहेत, ते पात्र ठरतील असं वाटत नाही. कारण त्यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसत नाही. मुंबईच्या संघात दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी जर चांगला खेळ खेळला असता तर संघाची स्थिती वेगळी राहिली असती.मोठे खेळाडू चांगली कामगिरी करत नाहीत. काहीच मनासारखं होत नाहीये. सर्व प्रमुख खेळाडू साधारणच कामगिरी करत आहेत. या मोठ्या नावांमध्ये हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि शतक झळकावूनही तिलक वर्मा यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weak Heart Signs: हातांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Sunday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींवर सुर्यदेव होणार प्रसन्न; वाचा रविवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या प्रश्नी रस्त्यावर उतरण्याचा काँग्रेसचा इशारा

ICC Rules : क्रिकेट विश्वात उडणार खळबळ; आयसीसी बदलणार ४ नियम, सामना सुरू असतानाच चेंडू बदलणार रंग

Joint Pain Relief Tips: लहान वयातच तुम्हाला हाडं आणि सांधेदुखीचा त्रास होतोय का? या उपायांमुळे मिळेल आराम

SCROLL FOR NEXT