Viral Video Saam TV
Sports

IPL Fans Fight VIDEO Viral: खुर्च्या फेकल्या, लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; दिल्ली-हैदराबाद LIVE सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तुफान हाणामारी

Viral Video : प्रेक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL Fans Fight Video : आयपीएलमध्ये काल मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि हैदराबाद हे दोन संघ भिडले. तर स्टेडियमच्या स्टॅंड्समध्ये दोन्ही संघाचे फॅन्सही भिडले. सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

स्टेडियममध्ये झालेल्या वादानंतर प्रेक्षकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अरुण जेटली स्टेडियममध्ये कालच्या झालेल्या सामन्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे.

काल दिल्ली आणि हैदराबाद यांच्यात एक अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. मैदानात खेळाडूंची तर मैदानाबाहेर प्रेक्षकांची फटकेबाजी दिसून आली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये 3-4 तरुण एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. मात्र हा वाद कशामुळे झाला हे अजून स्पष्ट नाही. (Viral Video)

अरुण जेटली स्टेडियमच्या मोहिंदर अमरनाथ स्टँडवर हा सगळा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून निवेदन आले असून, 'सामन्यादरम्यान पोलिस अधिकारी नेहमी गणवेशात तसेच साध्या वेशात उपस्थित असतात.

त्यावेळी बंदोबस्तात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून भांडण करणाऱ्यांना समज दिली. दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल झालेली नाही. चौकशी केली असता असे आढळून आले की, सामना पाहताना अडथळा होत असल्याने झालेल्या वादानंतर ही मारहाणीची घटना घडली आहे. (Latest sports updates)

दिल्लीचा 9 धावांनी पराभव

कालच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 9 धावांनी पराभव केला. हैदराबादने दिल्लीला 197 धावांचं लक्ष्य दिलं होत. मात्र दिल्ली संघाला 188 धावाच करता आल्या.

आयपीएल-2023 मधील दिल्लीचा हा सहावा पराभव होता. दिल्ली 8 सामन्यांमध्ये 4 गुणांसह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर हैदराबाद संघ 8व्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Uddhav Thackeray : मध्यरात्री शिंदेंचं ऑपरेशन टायगर अन् ठाकरेंना जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत तडकाफडकी प्रवेश

लातूर हादरले! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; अमानुष कृत्यामागील कारण वाचून चीड येईल

Belapur Tourism : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT