Harry Brook Saam tTV
Sports

IPL Auction: हैदराबादने 13.25 कोटींना खरेदी केलेला हॅरी ब्रुक कोण? मयंक अग्रवालवरही 8.25 कोटींची बोली

मयंक अग्रवालला सनरायझर्स हैदराबादने 8.25 कोटींना विकत घेतले..

साम टिव्ही ब्युरो

IPL Auction : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मिनी लिलाव आज 23 डिसेंबर रोजी कोची येथे सुरू झाला. सनरायझर्स हैदराबादने इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकवर पैशांचा अक्षरश: वर्षाव करून सर्वांनाच चकित केले. हैदराबादने हॅरी ब्रूकला 13.25 कोटी रुपयांना खरेदी केले. ब्रूकची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. (Sports News)

हॅरी ब्रूकने इंग्लंडसाठी 26 जानेवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. त्याने आतापर्यंत 20 सामन्यांच्या 17 डावात 372 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 81 आहे. ब्रूकची सरासरी 26.57 आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 137.78 आहे.

मयंक अग्रवालला यावर्षी किंग्ज इलेव्हन पंजाबने रिलीज केलं होते. त्याला देखील सनरायझर्स हैदराबादने 8.25 कोटींना विकत घेतले. चेन्नई सुपरकिंग्स आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये मयंकला खरेदी करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली.  (IPL 2023)

मयंककडे किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबाद संघ त्याच्यावर मोठी जबाबदारी देऊ शकतो. मयंक हैदराबादचा नवीन कर्णधार बनू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! २ दिवसात हे काम कराच अन्यथा पीएम किसानचे ₹२००० बंद होणार

Maharashtra News Live Update: आज पुणे स्टेशनवरून एकही लोकल सुटणार नाही

३२ वर्षीय बायकोचे शिक्षकासोबत अफेअर; ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं, नागपुरातील धक्कादायक घटना

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

PM Modi Plays Football: प्रचार थांबताच पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये, मुलांसोबत खेळले फुटबॉल, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT