Hardik Pandya saam tv
Sports

मोठी बातमी! हार्दिक पांड्या आणि 'सरदार'ची अदलाबदल पक्की; एकाच झटक्यात बदलले समीकरण

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये मोठ्या ट्रेड डीलची चर्चा आहे. हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये, तर अर्शदीप सिंह मुंबई इंडियन्समध्ये जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

Namdeo Kumbhar

Hardik Pandya IPL Trade News : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट विश्वातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) या दोन फ्रँचायझींमध्ये एका मोठ्या ट्रेड डीलवर सहमती झाली आहे. या करारानुसार, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्सकडून खेळणार असून, आघाडीचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह मुंबई इंडियंसच्या संघात दाखल होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मिनी लिलावापूर्वी या दोन्ही संघांमध्ये ही अदलाबदल झाली आहे. ही ट्रेड डील जवळपास पक्की मानला जात आहे. कागदपत्रे तयार झाली आहेत, खेळाडूंकडून याला सहमती दर्शवण्यात आली आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) अधिकृत मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. फ्रँचायझी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या श्रेयस अय्यरच्या कप्तानीखाली खेळण्यास उत्सुक आहे, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील २ दिवसात याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.

मुंबईचे नेतृत्व आणि कामगिरी:

२०२४ च्या हंगामात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियंसमध्ये परतला होता आणि त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाची कामगिरी फारशी विशेष राहिली नाही. गेल्या तीन हंगामांपैकी दोनदा संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयश आले होते.

कर्णधार आणि प्रशिक्षकाचा निर्णय:

अर्शदीप सिंह हा गेल्या अनेक वर्षांपासून पंजाब किंग्स संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि यशस्वी गोलंदाज राहिला आहे. त्यामुळे त्याला सोडून हार्दिकला आपल्या संघात सामावून घेण्याचा निर्णय पंजाबच्या कर्णधार आणि प्रशिक्षकाने घेतला आहे. ही डील निश्चित झाल्यामुळे मुंबई इंडियंससोबतचा हार्दिकचा दुसरा टप्पा संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुलाबी थंडीची चाहूल अन् भक्तिसंगीताची बरसात; पुण्यात रंगली दिवाळी पहाट

Ramayana Collection : रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपट ४०० कोटींच्या उंबरठ्यावर; तिसऱ्या दिवशीही छप्परफाड कमाई, वाचा कलेक्शन

Railway Rule : रेल्वेने दिवाळीला गावी जाताय? मग चुकूनही बॅगेत फटाके ठेवू नका; अन्यथा होऊ शकते शिक्षा

BREAKING: पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; लाल्याला ३-४ जणांनी अडवलं अन् थेट..

Maharashtra Weather: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; ऐन दिवाळीत पहाटेचा गारवा वाढला, पण दिवसा तापमानात वाढ, IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT