आयपीएल स्पर्धेआधीच मोठी ट्रेड डील झाली आहे. ४ खेळाडूंची अदलाबदल झालीय.  Saam TV
Sports

IPL आधीच २ संघांमध्ये मोठा उलटफेर; ४ खेळाडूंची अदलाबदल होणार, कोण आहेत ते क्रिकेटपटू?

IPL 2027 CSK SRH four player trade deal : आयपीएल २०२७ आधीच दोन महत्वाच्या संघांमध्ये मोठा बदल झाला आहे. ट्रेड डीलनंतर ४ खेळाडूंची अदलाबदल करण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

आयपीएल २०२७ स्पर्धेच्या आधीच चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये मोठी ट्रेड डील झाली आहे. दोन्ही संघांत चार खेळाडूंसाठी ही ट्रेड डील झाली आहे. त्यानुसार, अष्टपैलू खेळाडू लियाम लिविंगस्टोन आणि जॅक एडवर्ड्स हे चेन्नई सुपर किंग्जमधून खेळतील, तर वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि नाथन एलिस हे सनरायझर्स हैदराबाद संघात असतील.

या ट्रेड डीलचे वैशिष्ट्य म्हणजे आयपीएलमधील सर्वात स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन हा चेन्नईच्या गोटात गेला आहे. हैदराबाद संघानं त्याला याआधी १३ कोटी मोजले होते. पण आता तो फक्त ६ कोटींमध्ये चेन्नईकडे गेला आहे. या ट्रेड डीलमध्ये त्याचं तब्बल ७ कोटींचं नुकसान झालं आहे. लिविंगस्टोन हा अष्टपैलू आहे. त्यामुळे चेन्नईला फलंदाजीसोबत गोलंदाजीतही पर्याय मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज जॅक एडवर्ड्स हा देखील चेन्नईच्या संघात असेल. सध्याच्या ३ कोटी रुपयांमध्येच तो या संघात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधीच हैदराबाद संघानं त्याला आपल्या संघात सहभागी करून घेतलं होतं. पण पायाला दुखापत झाल्यामुळे आयपीएलच्या गेल्या मोसमातील एकही सामना तो खेळू शकला नव्हता.

या ट्रेड डीलनुसार, सनरायझर्स हैदराबाद संघाच्या गोलंदाजीला धार येणार आहे. या संघात खलील अहमदचा समावेश करण्यात आला आहे. तो सध्याच्या ४.८ कोटी रुपयांमध्ये हैदराबाद संघात आला आहे. खलील यापूर्वी २०१८ ते २०२१ या मोसमात हैदराबाद संघाकडून खेळला आहे. खलीलने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नईकडून गोलंदाजी करताना जबरदस्त कामगिरी केली होती. १४ सामन्यांत त्यानं १५ विकेट्स घेतल्या होत्या.

२०२६ मध्ये तो पाच सामने खेळला होता. आता तो हैदराबाद संघाशी जोडला गेलाय. खलीलमुळं त्यांच्या गोलंदाजीची धार वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज नाथन एलिस हा देखील हैदराबाद संघात गेला आहे. सध्याच्या २ कोटींमध्येच तो संघाशी जोडला गेलाय. अखेरच्या षटकांत खोचक मारा करण्याची त्याची क्षमता जबरदस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींकडून भारतीय संविधानाला डावलण्याचा प्रयत्न

तेरे बाप का है क्या...तरी...! आधी शिवीगाळनंतर एकमेकांना धक्काबुक्की; परळीत धनंजय मुंडेंचे नगरसेवक आणि MIM चे कार्यकर्ते भिडले! Video

लाल की पांढरा तांदूळ, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहे उत्तम?

ऐन दिवाळीत 35 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Diwali Firecracker Colours: लाल, हिरवा आणि निळा, फटाक्यांमध्ये हे रंग येतात कुठून?

SCROLL FOR NEXT