nicholas pooran twitter
Sports

IPL 2026 : हैदराबाद अन् लखनौला कोट्यवधींचा चुना; पूरन आणि क्लासेनला डच्चू मिळणार?

Nicholas Pooran poor performance IPL 2026 analysis : आयपीएल 2026 मध्ये निकोलस पूरन आणि हेनरिक क्लासेन यांची खराब कामगिरी समोर आली आहे. कोट्यवधी रुपये मोजून घेतलेल्या या खेळाडूंना संघातून रिलीज करण्याची शक्यता वाढली आहे.

Namdeo Kumbhar

Indian Premier League latest news : आयपीएलमध्ये खेळाडूंच्या किमती आणि त्यांची मैदानावरील कामगिरी यांचा ताळमेळ बसवणे अनेकदा कठीण जाते. सध्या हेच चित्र काही महागड्या खेळाडूंच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहास पाहिले तर हेच दिसतेय. खेळाडूंना कोट्यवधी रूपये खर्च करून ताफ्यात घेतले जाते. पण अनेकदा अपेक्षाप्रमाणे कामगिरी करू शकत नाहीत. मिचेल स्टार्कला जवळपास २५ कोटी रूपयांत खरेदी केले होते, पण त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याशिवाय ऋषभ पंत (२७ कोटी) आणि कॅमेरून ग्रीन (२५ कोटी) यांची अवस्थाही काहीशी अशीच राहिली आहे. त्यात आता निकोलस पूरन आणि हेनरिक क्लासेन यांचाही नंबर लागलाय. त्यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

निकोलस पूरन

लखनौ सुपर जायंट्सने निकोलस पूरनला २१ कोटी रुपयांना रिटेन केले होते. २०२५ मध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती, पण त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्याचा फॉर्म खालावलेला दिसत आहे. आयपीएल २०२६ च्या पहिल्या ४ सामन्यांत पूरनने केवळ ४१ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसल्यामुळे फिटनेस आणि सरावाचा अभाव जाणवत आहे. जर त्याने लवकर लय पकडली नाही, तर लखनौ त्याला संघातून बाहेर करण्याचा विचार करू शकते.

हैदराबादची डोकेदुखी

सनरायझर्स हैदराबादने क्लासेनला २३ कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवले होते. २०२५ च्या हंगामात तो चमकला होता, पण जून २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यापासून त्याच्या बॅटमधून हव्या तशा धावा येत नाहीत. आयपीएल २०२६ मध्ये त्याने १८१ धावा केल्या असल्या, तरी त्याच्या खेळात पूर्वीसारखा 'इम्पॅक्ट' किंवा दरारा दिसत नाहीये. SA20 आणि मेजर लीग क्रिकेटमध्येही क्लासेनची कामगिरी अतिशय सामान्य राहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Constipation Home Remedy: सकाळी पोट साफ होण्यासाठी पाण्यामध्ये मिसळा हा पदार्थ, गॅस अन् अपचानाच्या समस्या होतील दूर

Sunday Horoscope: सुर्याच्या कृपेने ५ राशींचे नशीब उजळणार, रविवारची सुट्टी होणार खराब; वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: नसरापूर घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने घेतली दखल

CSK vs MI: सीएसकेसमोर मुंबई इंडियन्स चारीमुंड्या चीत; चेन्नईकडून दुसऱ्यांदा पराभव

भाजपच्या मोर्चावेळी का संतापल्या टीना चौधरी? गिरीश महाजनांबाबत काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT