Sunrisers Hyderabad celebrate victory as Rajasthan Royals slip in the IPL 2026 points table shake-up. 
Sports

IPL Points Table: आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पराभवानंतर राजस्थानला बसला फटका,अव्वलस्थानी असणाऱ्या पंजाबचं काय झालं?

IPL 2026 Points Table Update: आयपीएल २०२६ च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादलाही मोठा फायदा झाला आहे.

Bharat Jadhav

आयपीएल २०२६ चा ३६ वा सामना २५ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. वैभव सूर्यवंशीच्या शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांत २२८ धावा केल्या, परंतु सनरायझर्स हैदराबादच्या स्फोटक फलंदाजांसमोर त्यांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही.

शनिवारी झालेल्या आरआर विरुद्ध एसआरएच सामन्यापूर्वी, दिल्लीला २६५ धावांच्या विक्रमी धावसंख्येचा बचाव करता आला नाही, त्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या आणि आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत अपराजित असलेल्या पंजाब किंग्समुळे इतर संघांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सनरायझर्स हैदराबादला झाला फायदा

सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला ५ गडी राखून पराभूत केले. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सच्या संघाने २० षटकांत २२९ धावांचे लक्ष्य हैदराबादसमोर ठेवले. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने ५ गडी गमावून आणि ९ चेंडू शिल्लक असताना ते आव्हान पूर्ण केले. विजयानंतर सनरायझर्स हैदराबादने पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे असून संघ या टेबलमध्ये एक अंक पुढे गेला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये संघानं तिसरे स्थान पटकावले आहे.

पॉईंट्स सारखे असूनही हैदराबाद पुढे का?

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये दोन्ही संघाला प्रत्येकी १० पॉईंट्स आहेत. मात्र सनरायझर्स हैदराबादचा ०.८१५ चा रनरेट हा राजस्थान रॉयल्सच्या ०.६०२ च्या रनरेटपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच ते पॉई्ंट्स टेबलमध्ये वरच्या स्थानावर आहेत. सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थान चौथ्या स्थानावर आहे.

पंजाब किंग्सचे वर्चस्व कायम

आयपीएल २०२६ च्या ३६ सामन्यांनंतर पंजाब किंग्स एकही सामना न हरता अव्वल स्थानी कायम आहे. केवळ पावसामुळे सामना रद्द झाल्याने संघाने एक गुण गमावला आहे. अन्यथा आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांनंतर त्यांचे पॉई्ंट्स १३ आहेत. पंजाब किंग्सला हरवणे एक आव्हान बनले आहे.

इतर संघाची स्थिती

आयपीएल २०२६ मधील अव्वल चार संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर आहे, तर पंजाब किंग्सविरुद्ध २६५ धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. केकेआर सध्या आयपीएल २०२६ मधील सर्वात कमकुवत संघ आहे. गुजरात टायटन्स सातव्या, मुंबई इंडियन्स आठव्या आणि लखनौचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रिक्षा चालकांवर मराठीची सक्ती करण्याआधी शिकविण्याची गरज - रईस शेख

Blood Sugar Control: रक्तातील साखर 7 दिवसांत कंट्रोल! शेवग्याच्या पानांचा हा रामबाण उपाय तुम्हाला माहिती आहे का?

Delhi Airport : २२८ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला टेकऑफआधी आग, बाहेर पडताना अनेक जण जखमी; नेमकं काय घडलं?

Apurva Nemlekar Honeymoon Photos: हंपीमध्ये हनिमून एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर , पतीसोबतचे फोटो केले शेअर

मोठी बातमी! सिलिंडर बुकिंगच्या नियमात पुन्हा बदल होणार? महत्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT