IPL 2026 Playoff Scenario saam tv
Sports

IPL 2026 : धोनीच्या चेन्नईची अवस्था बिकट; पॉईंट्स टेबलमध्ये थेट तळाशी, प्लेऑफमध्ये जाणार का?

IPL 2026 Playoff Scenario: आयपीएल 2026 मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल दिसत आहेत. आरसीबी आणि राजस्थान टॉपवर आहेत, तर चेन्नई अजून विजयाच्या शोधात आहे. प्लेऑफसाठी 8 ते 9 सामने जिंकणं महत्त्वाचं असून नेट रन रेटही निर्णायक ठरणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएलमध्ये आतापर्यंत ११ सामने खेळवले गेले असून पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या सुरुवातीला रॉयल चॅलेंजर बंगळूरूने चांगला खेळ करत पॉईंट्स टेबलमध्ये अग्रस्थान पटकावलं आहे. तर पाच वेळा विजेती टीम चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या सिझनमध्ये अजून खातंही उघडता आलेलं नाही.

पॉईंट्स टेबलची सध्याची परिस्थिती

सध्या पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 4 टीम्सने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलीये. गतविजेत्या आरसीबीने यंदाच्या सिझनमध्ये उत्तम कामगिरी सुरु ठेवलीये. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला असून त्यांचं नेट रन रेटही चांगलं आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तिसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आणि चौथ्या स्थानावर पंजाब किंग्स या टीम्स असून त्याचं रनरनेटही प्लसमध्ये आहे.

प्लेऑफ गाठण्यासाठी किती विजय आवश्यक?

प्रत्येक टीमला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी साधारणतः 14 पैकी 8 ते 9 सामने जिंकणं गरजेचं आहे. इतके सामने जिंकल्यानंतर प्रत्येक टीमच्या खात्यात 16 ते 18 गुण होतात. मात्र इतकंच नाही तर रन रेटही चांगलं असणं महत्त्वाचं आहे. अशावेळी जर एखाद्या टीमने 10 सामने जिंकले तर त्यांची प्लेऑफमधील जागा जवळपास निश्चित मानली जाते.

रनरेटवरूनही बदलणार समीकरणं

समान पॉईंट्स असलेल्या टीम्समध्ये अंतिम स्थान गाठण्यासाठी नेट रन रेटचा आधार घेतला जातो. त्यामुळे सुरुवातीपासूनच चांगलं रन रेट राखणाऱ्या टीम्सना त्याचा फायदा होतो. सध्या आरसीबी आणि राजस्थान या दोन्ही टीम्सचं नेट रन रेट चांगलं असल्याने त्यांना स्पर्धेमध्ये पुढे फायदा होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या सिझनमध्ये काही टीम्सची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. तब्बल ५ वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्जची स्थिती फारच बिकट आहे. टीमने सलग तीन सामने गमावले असून ते पॉईंट्स टेबलच्या एकदम तळाला आहेत. मुंबई इंडियन्सने दोनपैकी एक सामना जिंकून सहावं स्थान मिळवलंय. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही टीम्सनाही अजून एकही विजय मिळवता आला नाहीये.

सोमवारी म्हणजेच आज कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. पंजाबचा फॉर्म सध्या चांगला आहे त्यामुळे हा सामना केकेआरसाठी काहीसा कठीण ठरू शकतो. मात्र हा सामना जिंकणं केकेआरसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. केकेआरला आजच्या सामन्यात विजय मिळून खातं उघडायचं आहे.

CSK अजून पहिल्या विजयाच्या शोधात

दरम्यान यंदाच्या सिझनमध्ये सीएसके ही एकमेव टीम आहे तिने तीन सामने खेळूनही एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात चेन्नईच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. तर आता चेन्नईचा पुढचा सामना शनिवारी दिल्लीसोबत रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! पक्षाच्या स्थापना दिवशीच कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Shivali Parab Photoshoot: कल्याणच्या चुलबुलीचा परदेशात जलवा, हे 5 फोटो पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: गोविंदराव मोकाटे यांना राहुरीत उमेदवारी

सुनेत्रा पवारांच्या विरोधात २० पेक्षा जास्त अर्ज, एकनाथ शिदेंकडून पहिली प्रतिक्रिया, थेट बारामतीकरांना म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला जन्मठेप; हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT