DC VS RR IPL 2026: DELHI CAPITALS BEAT RAJASTHAN, PLAYOFF RACE GETS INTENSE saam tv
Sports

DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

IPl 2026 DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा आणि या हंगामातील एकूण सहावा विजय असून, त्यामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. राजस्थान रॉयल्सचा हा सलग तिसरा आणि एकूण सहावा पराभव आहे.

Bharat Jadhav

दिल्ली कॅपिटल्सने आज आयपीएल २०२६ मधील आपला सहावा विजय नोंदवला. दिल्लीने अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सला ५ गडी राखून पराभूत केले. या आयपीएलच्या हंगामातील ६२ व्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, चांगली सुरुवात करूनही राजस्थान रॉयल्स केवळ १९३ धावाच करता आल्या.

मिचेल स्टार्कसह दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. त्यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी अर्धशतके झळकावून शेवटच्या षटकात विजय निश्चित केला. पंजाब किंग्सच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची चांगली संधी मिळाली होती, पण रियान परागच्या संघाने ती गमावली आहे.

राहुल आणि पोरेल यांनी विजयाचा पाया रचला

दिल्ली कॅपिटल्सला केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी एक भक्कम सुरुवात करून दिली. दिल्लीचा संघ आपल्या फलंदाजीची चांगली सुरुवात करताना अडखळत असायचा.परंतु या आजच्या सामन्यात दिल्लीनं चांगली सुरुवात केली. आज पोरेलने २९ चेंडूंमध्ये शानदार अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या बाजुला केएल राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी मिळून केवळ १० षटकांत १०५ धावांची भक्कम भागीदारी रचून एक मजबूत पाया रचला.

पण यानंतर दिल्लीला एकापाठोपाठ एक धक्के बसले आणि धावगती मंदावली. जोफ्रा आर्चरने दोन बळी घेऊन राजस्थानला सामन्यात परत आणले. यानंतर फलंदाजीत अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या कर्णधार अक्षर पटेलने संघाची सूत्रे हाती घेतली. पण मागील सामन्यात स्फोटक अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून देणारा अक्षर, आज त्याच फलंदाजीच्या लयीत परतला. त्याने संघाला लक्ष्याच्या जवळ आणून ठेवले. अखेरीस आशुतोष शर्माने संघाच्या या हंगामातील सहाव्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

आरआरची वेगवान सुरुवात, मग स्टार्कचा कहर

राजस्थान रॉयल्सची सामन्याची सुरुवात खराब झाली, सलामीवीर यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाला. मात्र, मैदानात येताच वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा फटकेबाजी सुरू केली. षटकार मारून आपल्या खात्याची सुरुवात करणाऱ्या वैभवने अवघ्या २१ चेंडूंमध्ये ४६ धावा ठोकल्या. या दरम्यान त्याने ध्रुव जुरेलसोबत ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर कर्णधार रियान परागने स्फोटक अर्धशतक झळकावत संघाला अवघ्या १४ षटकांत १६० धावांपर्यंत पोहोचवले.

पण त्यानंतर पुढे राजस्थानचा डाव घसरू लागला आणि दिल्लीने जोरदार पुनरागमन करत त्यांना १९३ धावांवर रोखले. वैभव आणि पराग यांच्याबरोबरच ध्रुव जुरेलनेही वेगवान सुरुवात केली, पण अखेरीस तो ४० चेंडूंमध्ये केवळ ५३ धावाच करू शकला. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने आपल्या भेदक गोलंदाजीने राजस्थानच्या फलंदाजांना गुडघ्यावर आणलं. त्याने ४० धाव देत ४ बळी घेतले. माधव तिवारी आणि लुंगी एनगिडी यांनी काटकसरीने गोलंदाजी करत प्रत्येकी २ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT