kkr vs srh x
Sports

IPL 2025 मध्ये खेळण्यासाठी 'या' क्रिकेटपटूने केला हनीमून कॅन्सल, संसार सुरु होण्याआधीच...

KKR VS SRH IPL 2025 : ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना खेळला गेला. या सामन्यात हैदराबादकडून नव्या श्रीलंकन खेळाडूने आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केले.

Yash Shirke

IPL 2025 : कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये कोलकाताचा विजय झाला. पण केकेआरच्या विजयापेक्षा जास्त चर्चा हैदराबादच्या एका गोलंदाजाची झाली. त्या गोलंदाजाचे नाव आहे - कामिंदु मेंडिस. कामिंदुने हैदराबादकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले.

कालच्या सामन्यात हैदराबादकडून खेळताना कामिंदुने मेंडिसने २७ धावा केल्या. पदार्पणाच्या सामन्यात त्याने एक विकेट देखील घेतली. दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्याने त्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. गोलंदाजी करतानाचे त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले. कामगिरी व्यतिरिक्त कामिंदु मेंडिसचे खासगी जीवन देखील चर्चेत आले आहे. आयपीएल खेळण्यासाठी त्याने हनीमून कॅन्सल केल्याची माहिती समोर आली आहे.

मार्च २०२५ मध्ये कामिंदु मेंडिसने गर्लफ्रेंड निशनीची लग्न केले. अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. एप्रिल २०२४ मध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला होता. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लग्नाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. दरम्यान सुप्रसिद्ध वेडिंग प्लानर पथुम गुनावर्दना यांनी कामिंदु मेंडिसचा हनीमून कॅन्सल झाल्याची माहिती दिली.

सनरायजर्स हैदराबादच्या संघात कामिंदु मेंडिसची निवड झाली. लग्नानंतर लगेच आयपीएल सुरु होत असल्याने कामिंदुने हनीमूनसाठी परदेशात जाण्याचा प्लान कॅन्सल केला. कामिंदु आणि त्याची पत्नी लग्नानंतर त्याच्या देशातच, श्रीलंकेमध्ये हापुताले या ठिकाणी फिरायला गेले होते, अशी माहिती पथुम गुनावर्दना यांनी माध्यमांना दिली. आयपीएल खेळण्यासाठी हनीमून कॅन्सल करण्याच्या निर्णयावरुन कामिंदुची क्रिकेटवर किती निष्ठा आहे असे त्याचे चाहते म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 Collection : जगभरात 'धुरंधर 2'चा धुमाकूळ; 1,400 कोटींच्या उंबरठ्यावर, रणवीर सिंहने रचला इतिहास

Maharashtra Live News Update: जळगावातील ग्रामीण भागात एलपीजी संकट, गॅस पंपावर ऑटो रिक्षा चालकांची गर्दी

Blood Pressure: ब्लड प्रेशर तपासताना या चूका करणं लगेचच थांबवा, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT