faf du plessis yandex
Sports

IPL 2025 Retention: 1,2 नव्हे तर 5 संघांनी कॅप्टनलाच केलं संघाबाहेर; पाहा कोणते आहेत ते संघ

IPL 2025 Retention News In Marathi: आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Ankush Dhavre

IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सर्व १० संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. १० संघांनी एकूण ४६ खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर उर्वरित २०० हून अधिक खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला आपल्या संघात कायम ठेवलं आहे. तर अन्कॅप्ड खेळाडू म्हणून चेन्नईने एमएस धोनीला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे ५ संघांनी आपल्या कर्णधारांना रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र आगामी हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी श्रेयस अय्यर ऑक्शनमध्ये असणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स

आगामी हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनेही मोठा निर्णय घेतला आहे. गेली ९ वर्ष दिल्लीकडून खेळणाऱ्या रिषभ पंतला दिल्लीने टाटा बायबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार रिषभ पंत आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.

लखनऊ सुपर जायंट्स

लखनऊ सुपर जायंट्स संघाने आगामी हंगामापूर्वी केएळ राहुलला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर लखनऊचे मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर केएल राहुल या संघाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर त्याने या संघाची साथ सोडली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने देखील सर्वांना आश्चर्चकीत करणारा निर्णय घेतला आहे. या संघाने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयालला रिटेन केलं आहे. तर कर्णधार फाफ डू प्लेसिसला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्ज

शिखर धवनने २०२२ ते २०२४ पर्यंत पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व केलं. त्याने काही महिन्यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे पंजाबने त्याला रिलीज केलं आहे. आगामी हंगामात पंजाबला नवा कर्णधार मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samir Choughule : समीर चौघुलेचा आनंद गगनात मावेना, कॉमेडी King 'या' पुरस्काराने सन्मानित, प्राजक्ता माळीने केलं खास कौतुक

Crime : महाराष्ट्राच्या लेकीची भोपाळमध्ये हत्या; प्रियकराने कुटुंबाच्या मदतीने रचला क्रूर कट; लोखंडी पेटीतून बाहेर आलं संतापजनक वास्तव

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी १८,००० रुपयांवरुन ५८,८०० होणार

Liver Problems: लिव्हरला पूर्णपणे पोखरतात हेपेटाइटिस B आणि C; पाहा व्हायरस शरीरात गेल्यावर पहिल्यांदा काय बदल दिसतात?

SCROLL FOR NEXT