MS Dhoni In IPL 
Sports

MS Dhoni: आयपीएल विश्वातील सर्वात मोठी घडामोड; एमएस धोनी CSK मधून खेळणार?, पडद्यामागं काय घडलं?

MS Dhoni In IPL: चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2023 मध्ये चॅम्पियन बनवल्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल असे मानले जात होते, परंतु चाहत्यांच्या मागणीनुसार तो पुढील हंगामात खेळण्यासाठी परतला. आता पुन्हा एकदा धोनी चाहत्यांची इच्छा पूर्ण करणार आहे.

Bharat Jadhav

एमएस धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार का? हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता प्रश्नाचं उत्तर मिळालंय. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनी पुढच्या हंगामातही 'यलो जर्सी'मध्ये दिसणार आहे. धोनीने स्वतः याची घोषणा केली असून आता एका रिपोर्टनुसार चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही त्या वृत्ताला दुजोरा दिलाय. आयपीएलच्या सलग १८ व्या हंगामात धोनी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

धोनीची घोषणा

क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, एमएस धोनी पुढील सीझनमध्ये देखील खेळताना दिसणार आहे. धोनीच्या व्हायरल व्हिडिओनंतर या निर्णयाची पुष्टी करणाऱ्या फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या हवाल्याने हे सांगण्यात आलंय. काशी विश्वनाथन म्हणाले की, जर धोनी तयार असेल तर फ्रँचायझी देखील आनंदी आहे, कारण त्यांनाही हेच हवे आहेत. धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो म्हणत आहे की त्याला त्याच्या कारकिर्दीच्या उर्वरित वर्षांत क्रिकेटचा आनंद घ्यायचाय.

धोनी आयपीएलमध्ये खेळणार की नाही, यावरून मागील २ ते ३ वर्षांपासून गोंधळाची स्थिती आहे. प्रत्येक हंगामात धोनी पुढील वर्षी खेळणार असा प्रश्न केला जातो. इतकेच काय २०२३मध्ये सीएसकेला चॅम्पियन बनवल्यानंतर असं वाटत होतं की, धोनी आता क्रिकेटमधून संन्यास घेईल. परंतु चाहत्यांना त्याला क्रिकेट मैदानात पाहायचं होतं.त्यामुळे तो पुन्हा २०२४ मध्ये आयपीएलच्या मैदानात उतरला होता.

किती मानधन दिलं जाईल

जोपर्यंत धोनीच्या रिटेन्शनचा प्रश्न आहे तर त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले जाईल. त्यामुळे फ्रँचायझीला त्याच्यासाठी फक्त 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी जुना नियम पुन्हा लागू केला आहे, ज्या अंतर्गत गेल्या ५ वर्षांपासून कोणत्याही खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल. किंवा सलग ५ वर्षे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू प्लेइंग ११ चा भाग नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT