भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या इशान किशनवर आयपीएल लिलावात पैशांचा पाऊस पडला आहे. लिलावात उतरलेल्या इशान किशनची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. गेली काही वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या इशान किशनला मुंबईने रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र मुंबई त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावणार याची कल्पना सर्वांना होती. मुंबईने त्याला संघात घेण्यासाठी पूर्ण जोर लावला.
सुरुवातीला मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज अशी लढत पाहायला मिळाली. त्यानंतर दिल्ली, हैदराबादही मैदानात उतरले. हैदराबादने पंजाबला मागे सोडलं. मात्र हैदराबादने बोली लावणं सुरु ठेवलं. शेवटी हैदराबादने इशान किशनला ११.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.
इशान किशनने २०१६ मध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण केलं होतं. त्याला आतापर्यंत १०५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १३५.९ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत २६४४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी २८.४ इतकी होती. त्याच्या नावे १६ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे. ९९ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
इशान किशनला आतापर्यंत गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. २०१६ आणि २०१७ मध्ये तो गुजरात कडून खेळताना दिसून आला होता. त्यानंतर २०१८ पासून ते २०२४ पर्यंत तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.