Rishabh Pant News In Marathi: आयपीएल २०२५ स्पर्धेचे मेगा ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये सुरु आहे. लिलावाच्या पहिल्या दिवसातील पहिल्याच सेटमध्ये रेकॉर्डब्रेक बोली लागली. सुरुवातीला केकेआरचा माजी खेळाडू श्रेयस अय्यरवर आयपीएल स्पर्धेतील सर्वात मोठी बोली लागली.
पंजाब किंग्जने त्याला २६.२५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. मात्र हा रेकॉर्ड अवघ्या काही मिनिटाच मोडला गेला. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला २७ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.
रिषभ पंत हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रिषभला आपल्या संघात घेण्यासाठी दिल्लीने पू्र्ण जोर लावला. मात्र आरटीएमसाठी लखनऊने २७ कोटींची बोली लावली. त्यावेळी दिल्लीने माघार घेतली. रेकॉर्डब्रेक बोलीसह रिषभ पंत लखनऊच्या ताफ्यात दाखल झाला
गेल्या हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसून आला होता. या हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवलं होतं. मात्र कोलकाताने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. आता आगामी हंगामात तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसून येणार आहे.
अर्शदीप सिंग - १८ कोटी (पंजाब किंग्ज ) RTM
कगिसो रबाडा - १०.७५ कोटी( गुजरात टायटन्स)
श्रेयस अय्यर -२६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)
जोस बटलर -१५.७५ कोटी (गुजरात टायटन्स)
मिचेल स्टार्क - ११.७५ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)
रिषभ पंत - २७ कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.