ipl auction twitter
Sports

IPL 2025: मोहम्मद कैफ, युवराज सिंगसह तेंडुलकरही लिलावाच्या रिंगणात! Base Price किती? जाणून घ्या

ipl 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावात मोहम्मद कैफ, युवराज सिंगसह तेंडुलकरही असणार आहेत.

Ankush Dhavre

IPL 2025 Mega Auction News In Marathi: आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव येत्या २४-२५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दा या शहरात रंगणार आहे. या लिलावासाठी १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. तर ३१ ऑक्टोबरला सर्व १० फ्रेंचायझींनी एकूण ४६ खेळाडूंना रिटेन केलं आहे.

लिलावासाठी नाव नोंदणी करणाऱ्यांमध्ये ११६५ भारतीय तर ४०९ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावासाठी मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांनी देखील नाव नोंदणी केली आहे.

भारताचा स्टार फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनेही आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली आहे. गेल्या २ हंगामांपासून तो या संघाकडून खेळतोय. आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना रिटेन केलं आहे.

तर अर्जुन तेंडुलकरला रिलीज केलं आहे. त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये इतकी असणार आहे. उत्तर प्रदेशचा २७ वर्षीय स्टार खेळाडू युवराज सिंगनेही आगामी लिलावासाठी आपलं नाव नोंदवलं आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाकडून खेळणाऱ्या या खेळाडूने आजवर एकही टी-२० सामना खेळलेला नाही. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने २७३ धावा चोपल्या आहेत. या लिलावात त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये असणार आहे.

आगामी आयपीएल स्पर्धेसाठी होणाऱ्या लिलावाच्या रिंगणात मोहम्मद कैफ देखील असणार आहे. कैफ हा भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीचा भाऊ आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणाऱ्या या गोलंदाजाने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये २२ गडी बाद केले आहेत. त्याची मूळ किंमतही ३० लाख रुपये इतकी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

Nikhil Bane : फायनली ती माझ्या आयुष्यात आली; हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Majalgaon Rain : माजलगावमध्ये ढगफुटी; गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, गावांमध्ये पाण्याचा वेढा

Kalyan Crime : हॉस्पिटलच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याला लुबाडले, लाखो रुपये उकळले, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Bigg Bossनं घरातील 2 सदस्यांना सुनावली कठोर शिक्षा, संपूर्ण सीझनसाठी केले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT