delhi capitals yandex
क्रीडा

IPL 2025: Delhi Capitals ला 'जोर का झटका'; 10 कोटीत रिटेन केलेला तगडा प्लेअर Auction मध्ये येणार? नेमकं प्रकरण काय?

Tristan Stubbs Registered Himself For IPL 2025 Mega Auction: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू ट्रिस्टन स्टब्सने आयपीएल लिलावासाठी नाव नोंदवलं आहे.

Ankush Dhavre

Tristan Stubbs News In Marathi: आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. काही ३१ ऑक्टोबरला सर्व १० संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सर्व संघांनी एकापेक्षा एक धाकड खेळाडूंना आपल्या संघात कायम ठेवलं.

दिल्ली कॅपिटल्सने कुलदीप यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्सला रिटेन केलं. तर रिषभ पंतला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने ट्रिस्टन स्टब्सला गेल्या हंगामात ५० लाखात खरेदी केलं होतं. मात्र या हंगामासाठी त्याला १० कोटी रुपये दिले आहेत. दरम्यान त्याने केलेल्या एका कृत्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आयपीएल कमिटीने ऑक्शनसाठी नाव नोंदणी केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. या ऑक्शनमध्ये १५७४ खेळाडूंनी नाव नोंदवलं आहे. ज्यात २५३ व्या स्थानी ट्रिस्टन स्टब्सचं नाव आहे. टी -२० क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने गेल्या हंगामात दमदार कामगिरी केली होती.

ही कामगिरी पाहता त्याच्या मानधनात २००० टक्के वाढ करण्यात आली. गेल्या हंगामात ५० लाख तर या हंगामात त्यासल १० कोटी रुपये दिले आहेत. असं असून सुद्धा त्याचं नाव ऑक्शनमध्ये आलं, हे पाहून टीम मॅनेजमेंटला नक्कीच धक्का बसला असेल.

ट्रिस्टन स्टब्स च्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने गेल्या हंगामात फलंदाजी करताना १४ सामन्यांमध्ये ५४ च्या सरासरीने ३७८ धावा चोपल्या होत्या. यादरम्यान तो आपल्या स्ट्राइक रेटमुळे चर्चेत आला होता.

त्याने १९०.९१ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ३ तुफानी अर्धशतकं झळकावली होती.आता स्टब्सने लिलावासाठी नाव नोंदवलय हे पाहून टीम मॅनेजमेंट काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ट्रिस्टन स्टब्स हा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे दिल्ली त्याला कुठल्याही परिस्थितीत रिटेन करणारच होती. ट्रिस्टन स्टब्ससह दिल्लीने अक्षर पटेलला पहिल्या स्थानी म्हणजे १६.५ कोटी रुपये देऊन रिटेन केलं आहे. तर कुलदीप यादवला १३.२५ कोटी, ट्रिस्टन स्टब्सला १० कोटी आणि अभिषेक पोरेलला ४ कोटी रुपये देऊन रिटेन केलं आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नालासोपाऱ्यात एटीएम व्हॅनमध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये

MNS vs Thackeray Group : ठाकरे गटात जाताच अखिल चित्रेंचा राज ठाकरेंवरच हल्लाबोल, VIDEO

MNS - Shinde Group : मनसे - शिंदेसेना संघर्षाचं कारण आलं समोर, एकनाथ शिंदेंनी केला गौप्यस्पोट | VIDEO

Anil Ambani: अनिल अंबानीचं रोजा पॉवर शेअर्सनं बदललं नशीब; फेडलं सारं कर्ज

IPL 2025 New Rule:Ben Stokes आयपीएलचे पुढील २ हंगाम खेळू शकणार नाही! काय आहे BCCI चा नवीन नियम?

SCROLL FOR NEXT