GT vs SRH Pitch Report 
Sports

GT vs SRH Pitch Report: धावांचा डोंगर की विकेटची घसरगुंडी? खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड अन् हवामान रिपोर्ट

GT vs SRH Pitch Report: अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि सनराझजर्स हैदराबादमध्ये आज भिडत होणार आहे. गुजरातच्या संघाला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आज ते कोणत्याही परिस्थिती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

Bharat Jadhav

'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फलंदाजीमुळे गुजरातला मागली सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवातून सावरत ते सनरायझर्स हैदराबादच्या संघाशी दोन हात करणार आहेत. हैदराबादला पराभूत करत गुजरात आयपीएलमध्ये कमबॅक करणार का? हे आज दिसेल. दरम्यान प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सनरायझर्सला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.

राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय सूर्यवंशीने फक्त ३५ चेंडूत शतक झळकावत गुजरातच्या गोलंदाजीचा धुलाई केली होती. तो आयपीएलमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाजही ठरला होता. गुजरात टायटन्स हा अशा संघांपैकी एक आहे जो या हंगामात सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यांच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये खूप चांगली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने नऊ सामन्यांत सहा विजय मिळवले आहेत तर पॉईट्स टेबलवर ते चौथ्या स्थानी आहेत.

गुजरातची गोलंदाजी पाहिली तर प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा हे वेगवान त्रिकूट प्रभावी आहेत. फिरकी गोलंदाजांमध्ये रशीद खानने देखील फॉर्ममध्ये परतलाय. त्याने २५ धावा देऊन दोन बळी घेतले तर त्याला वॉशिंग्टन सुंदरची चांगली साथ मिळाली. हैदराबाद सोबत झालेल्या मागील सामन्यात गुजरातने त्यांना मात दिली होती.

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातने सनरायझर्स हैदराबादचा सात विकेट्सने पराभव केला होता. यात सिराजने १७ धावा देत चार विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसरीकडे सनरायझर्ससाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी सनरायझर्ससाठी तुकड्या-तुकड्यांमध्ये चांगली कामगिरी केलीय.

वरच्या फळीच्या अपयशामुळे मधल्या फळीवर दबाव आलाय. या फळीतील हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी आणि इशान किशनसारखे फलंदाज फॉर्ममध्ये नाहीत. गेल्या दोन सामन्यांमध्ये अभिषेकला दुहेरी आकडाही गाठता आला नाहीये. तर हेडने आठ डावांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावलंय. २३ वर्षीय अनिकेत वर्माने अनेक प्रसिद्ध फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केलीय.

नरेंद्र मोदी स्टेडियम कोणाला देणार साथ?

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी मानली जाते. येथे डावाच्या सुरुवातीला गोलंदाजांना थोडी मदत मिळते. तर अहमदाबादमध्ये विविध प्रकारच्या खेळपट्ट्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये काळी माती, लाल माती आणि दोघांचे मिश्रण असलेली खेळपट्टी सुद्धा आहे. या खेळपट्ट्या शेवटी-शेवटी डाव फिरवतात.

काळ्या मातीच्या खेळपट्टीवर, १८०-१९० च्या आसपासचा स्कोअर बनू शकतो. लाल मातीच्या खेळपट्टीवर २१०-२२० च्या आसपासचा स्कोअर विजयासाठी योग्य मानला जातोय. याचा अर्थ असा की सामना कोणत्याही खेळपट्टीवर खेळला गेला तरी धावांचा ढीग होईलच.

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, आज अहमदाबादमध्ये आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 Cast Fees : टायगर श्रॉफ ते श्रेयस तळपदे, 'बागी 4'साठी कोणी किती घेतलं मानधन?

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT