LSG Vs PBKS IPL 2025 X (twitter)
Sports

LSG Vs PBKS : लखनऊ 'सुपर' की पंजाब 'किंग्स'? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोण वरचढ? दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग ११

LSG Vs PBKS IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स हा सामना आज एकना स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयपीएलच्या इतिहासात लखनऊ-पंजाब यांच्यामध्ये कोण सरस ठरले आहे? या सामन्यात प्लेईंग ११ कशी असेल? जाणून घेऊयात...

Yash Shirke

लखनऊ सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२५ मधील ११ वा सामना आज एकना क्रिकेट स्डेटियम, लखनऊ येथे खेळला जाणार आहे. घरच्या स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात असल्याने लखनऊच्या संघाचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला होता. आता पुन्हा विजयी होण्यासाठी लखनऊ आणि पंजाब हे दोन्ही संघ झुंज देणार आहेत.

आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या सामन्यात लखनऊचा पराभव झाला होता. त्यानंतर कमबॅक करत लखनऊने बलाढ्य हैदराबादच्या संघाला पाणी पाजले होते. दुसऱ्या बाजूला पंजाबने रोमांचक सामन्यात गुजरातवर विजय मिळवला होता. त्यामुळे आजचा सामना जिंकणे हा पंजाब आणि लखनऊ यांच्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड

दरम्यान लखनऊ आणि पंजाब याआधी आयपीएलच्या इतिहासात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार, लखनऊ-पंजाब हे संघ आयपीएलमध्ये चार वेळा आमनेसामने आले आहेत. या चार सामन्यांपैकी ३ सामने लखनऊच्या संघाने जिंकले आहेत. तर एका सामन्यामध्ये पंजाबने दमदार विजय मिळवला होता. यावरुन लखनऊ पंजाबवर वरचढ ठरत असल्याचे पाहायला मिळते.

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेईंग ११ -

मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, प्रिन्स यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT