hardik pandya saam tv news
क्रीडा

Hardik Pandya MI Captain: रोहितला काढून हार्दिकला कॅप्टन बनवण्यामागे काय आहे मुंबईचा मास्टरप्लान?

Ankush Dhavre

Mumbai Indians Captaincy:

आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी जेव्हा हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स संघात एन्ट्री झाली. तेव्हाच असं म्हटलं जात होतं, की हार्दिक पंड्या मुंबईचा भावी कर्णधार होणार. हा अंदाज आता खरा ठरलाय. मुंबईने रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याच्या हाती सोपवली आहे. मात्र हार्दिक पंड्याला कर्णधारपद देण्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या.

गेल्या ३ हंगामातील कामगिरी..

मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र गेल्या ३ हंगामात मुंबई इंडियन्स संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. २०२१ आणि २०२२ मध्ये मुंबईला प्लेऑफमध्येही प्रवेश करता आला नव्हता. २०२२ मध्ये तर मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी होता. २०२३ मध्ये मुंबईने प्लेऑफ गाठलं, मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही.

गेल्या तिन्ही हंगामात रोहितच्या नेतृत्वात ती धार दिसली नाही. त्याच्याकडे भारतीय संघाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली होती. मात्र इथेही त्याला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. हेच मुख्य कारण आहे की, रोहितला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

टी -२० फॉरमॅटपासून दूर..

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला आहे. मात्र टी -२० क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून तो टी -२० क्रिकेट खेळताना दिसून आलेला नाही. तर आयपीएल स्पर्धेतील गेल्या २ हंगामातही त्याची बॅट तळपली नाही. या वर्षी तर तो एकही टी -२० सामना खेळताना दिसून आलेला नाही. (Latest sports updates)

हार्दिकला कर्णधारपद का?

हार्दिक पंड्याला २०२२ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली गेली होती. या संधीच सोनं करत त्याने गुजरातला पहिल्याच हंगामात चॅम्पियन बनवलं होतं. पुढील हंगामात गुजरातचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. मुंबईला रोहित शर्माची रिप्लेसमेंट हवी होती. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडे हार्दिकशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT