ipl 2024 playoffs scenario gujarat titans out of race rcb csk srh have chance to quliify amd2000 google
क्रीडा

IPL 2024 Playoffs Scenario: मुंबई,पंजाबसह गुजरात स्पर्धेतून बाहेर! ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत

Ankush Dhavre

मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्जनंतर आता प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा तिसरा संघ समोर आला आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. यासह गुजरात टायटन्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ३ संघ बाहेर पडल्यानंतर प्लेऑफचं समीकरण आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी गुजरातला कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं. मात्र हा सामना पावसामुळे होऊच शकला नाही..

हा सामना खेळण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी तितका महत्वाचा नव्हता. सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला आहे. यासह कोलकाताचा संघ १९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर गुजरातचा संघ ११ गुणांसह आठव्या स्थानी आहे. हा सामना जिंकून गुजरातला प्लेऑफमध्ये जाण्याची थोडी फार संधी होती. मात्र आता हा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघांमध्ये लढत

चेन्नई सुपर किंग्ज संघांने गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. सध्या १४ गुणांसह हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. हैदराबादला इथून पुढे २ सामने खेळायचे आहेत.

हे सामने पंजाब आणि गुजरातविरुद्ध होणार आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तर हैदराबादचा संघ चेन्नईला मागे सोडत प्लेऑफमध्ये प्रवेश करेल्म तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला देखील प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे . या संघाचा एक सामना शिल्लक आहे. चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यात या संघाला १८ षटकात विजय मिळवावा लागणार आहे. तर गोलंदाजी करताना १८ धावा राखून विजय मिळवावा लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT