Fan emotional front of Gautam Gambhir :  x ipl twitter
Sports

VIDEO: KKRची दमदार कामगिरी; गंभीरच्या मार्गदर्शनाचं कौतुक करताना ढसाढसा रडला चाहता

Fan emotional front of Gautam Gambhir : केकेआर २०११ ते २०१७ पर्यंत संघाचे नेतृत्व केल्यानंतर आता तो मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. विशेष म्हणजे संघाचं मार्गदर्शन करताना यंदाच्या आयपीएल २०२४ मध्येही केकेआरने दमदार कामिगरी केली.

Bharat Jadhav

गौतम गंभीर कोलकाता संघाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहे. २०११ ते २०१७ पर्यंत संघाचे नेतृत्व केल्यानंतर आता तो मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. विशेष म्हणजे संघाचं मार्गदर्शन करताना यंदाच्या आयपीएल २०२४ मध्येही केकेआरने दमदार कामिगरी केली. याचदरम्यान गौतम गंभीरचं कौतुक करताना एक चाहता भावूक झाला असून तो ढसाढसा रडू लागला.

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका गौतम गंभीरने सांभाळताच केकेआरचे नशिब उजळलंय. सध्या केकेआर संघ पॉईंट्स टेबलमध्ये १८ पॉईट्ससह अव्वलस्थानी आहे. यामुळे यंदा केकेआरचा संघ ट्रॉफी जिंकू शकतो. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात एक चाहता गौतम गंभीरसमोर आपले मत मांडताना कोलकाता नाईट रायडर्सचा एक चाहता भावूक झाला. यावेळी त्याने गंभीरच्या मार्गदर्शनाचं कौतुक केले.

जेव्हापासून गौतम गंभीर पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स कॅम्पमध्ये सामील झाला आहे, तेव्हापासून संघ आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. यासारख्या स्थितीत कोलकाता नाइट रायडर्सचा एक चाहता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतम गंभीरला म्हणाला, “सर, मी तुमच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक आहे, मला एवढेच सांगायचे आहे, आता आम्हाला सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय आम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

चाहता पुढे म्हणाला, “तुम्ही सोडून गेल्यावर आम्हाला किती त्रास झाला. हे मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एका बंगाली गाण्याच्या माध्यमातून सांगतो. आम्ही तुम्हाला आमच्या हृदयात ठेवतो, कृपया आम्हाला आणखी त्रास देऊ नका.” या दरम्यान चाहत्यांला अश्रू अनावर झाले, याचा व्हिडीओ केकेआरने एक्सवर शेअर केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT