ipl 2024 latest points table update after mi vs rcb match amd2000 twitter
Sports

IPL 2024, Points Table: सलग दुसऱ्या विजयानंतर मुंबईची गुणतालिकेत मोठी झेप! RCB चं टेन्शन वाढलं

IPL Points Table Udpate After MI vs RCB Match: गुरुवारी( ११ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते

Ankush Dhavre

गुरुवारी( ११ एप्रिल) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये एकतर्फी लढत पाहायला मिळाली. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आणि गुणतालिकेत वर जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांतील फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. मात्र गोलंदाजांना धावांचा बचाव करता आला नाही.

या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने ४ सामने खेळले आहेत. यापैकी केवळ एका सामन्यात मुंबईला विजय मिळवता आला होता. २ गुणांसह हा संघ आठव्या स्थानी होता. तर ५ पैकी १ सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी होता.

आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईने ५ सामने खेळले असून २ सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ९ व्या स्थानी कायम आहे.

असे आहेत सर्व १० संघ ...

१) राजस्थान रॉयल्स

२) कोलकाता नाईट रायडर्स

३) लखनऊ सुपरजायंट्स

४) चेन्नई सुपर किंग्ज

५) सनरायझर्स हैदराबाद

६) गुजरात टायटन्स

७) मुंबई इंडियन्स

८) पंजाब किंग्ज

९) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

१०) दिल्ली कॅपिटल्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT