ipl 2024 latest points table update after dc vs srh match mumbai indians amd2000 twitter
क्रीडा

IPL 2024 Points Table: हैदराबादच्या पराभवानंतर दिल्लीला मोठा धक्का! मुंबई इंडियन्सची गुणतालिकेत मोठी झेप

IPL Points Table Update After DC vs SRH Match: हा सामना हैदराबादने ६८ धावांनी जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर शानदार विजय मिळवला आहे. आपल्या होम ग्राऊंडवर खेळ असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटक अखेर २६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव १९.१ षटकात अवघ्या १९९ धावांवर आटोपला. हा सामना हैदराबादने ६८ धावांनी जिंकला. दरम्यान या सामन्यानंतर कशी आहे गुणतालिकेची स्थिती? जाणून घ्या.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शानदार विजयानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानी कायम आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तिसऱ्या स्थानी आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सलामीला आलेल्या ट्रेविस हेडने वादळी खेळी केली. त्याला सर्वात वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो ८९ धावांवर बाद होऊन माघारी परतला. या तुफानी खेळीसह त्याने ऑरेंज कॅपच्या यादीत प्रवेश केला आहे. आतापर्यंत त्याने ६ सामन्यांमध्ये ३२४ धावा केल्या आहेत. तर अव्वल स्थानी असलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत ७ सामन्यांमध्ये ३६१ धावा केल्या आहेत. या यादीत रियान पराग, रोहित शर्मा आणि केएल राहुल या फलंदाजांचा समावेश आहे.

दिल्लीचा संघ कितव्या स्थानी?

घरच्या मैदानावर पराभव झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीने आतापर्यंत ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी घसरला आहे. या पराभवाचा मुंबई इंडियन्स संघाला फायदा झाला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT