IPL News Saam TV
Sports

IPL 2024 Point Table: कोलकाताच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, KKRची पहिल्या स्थानावर झेप

IPL 2024, KKR vs DC : कोलकाताचा संघ पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होता. तर दिल्ली सातव्या स्थानावर होती. केकेआरच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये थोडा बदल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

IPL 2024 News :

आयपीएलच्या १६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटलवर १०६ धावांनी विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सचा हा या सीजनमधील सलग तिसरा विजय आहे. कालच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. कोलकाताने पॉईंटटेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर दिल्लीचा संघा नवव्या स्थानावर घसरला आहे.

या सामन्याआधी कोलकाताचा संघ पॉईंटटेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होता. तर दिल्ली सातव्या स्थानावर होती. केकेआरच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये थोडा बदल झाला आहे. हा सामना जिंकल्यानंतर कोलकाताच संघ पॉईंटटेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी राजस्थान रॉयल्स संघ पॉईंटटेबलमध्ये पहिल्या स्थानावर होता. (Latest News)

दिल्ली कॅपिटल्सचा संघ पराभवानंतर सातव्या स्थानावरून नवव्या स्थानावर आला आहे. दिल्लीचा संघ आता आरसीबीपेक्षाही खालच्या खाली पोहोचला आहे. दिल्लीच्या पराभवामुळे आरसीबीला एका स्थानाचा फायदा झाला आहे. आधी बंगलोरचा संघ नवव्या स्थानावर होता पण आता आठव्या स्थानावर आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानावर?

  1. कोलकाता नाईट रायडर्स

  2. राजस्थान रॉयल्स

  3. चेन्नई सुपरकिंग्स

  4. लखनऊ सुपरजायन्ट्स

  5. गुजरात टायटन्स

  6. सनरायझर्स हैदराबाद

  7. पंजाब किंग्स

  8. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर

  9. दिल्ली कॅपिटल्स

  10. मुंबई इंडियन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

Chief Minister Fadnavis: सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT