Hardik Pandya 
क्रीडा

Hardik Pandya: सलग ३ पराभवानंतर MIच्या कर्णधाराला आठवला 'भोलेनाथ'; हार्दिकने महादेवाला घातलं दुग्धाभिषेक

Hardik Pandya Take Bless Somnath Temple : पदरी नेहमीच निराशा येत असल्याने हार्दिकने आता देवांचा देव महादेवाला धावा केलाय. हार्दिकने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन दुग्धाभिषेक करुन दर्शन घेतले.

Bharat Jadhav

Hardik Performed Milk Abhishek At Somnath Temple :

आयपीएल आणि राजकारणामुळे देशातील तापमाना वाढलंय. आयपीएलच्या १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्सला एकही विजय मिळवता आला नाहीये. यंदाचे सत्र मुंबई फ्रेंचायझीने आयपीएलच्या सुरुवातीला संघात बदल करत रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं. परंतु हार्दिकच्या नेतृत्त्वात मुंबईच्या संघाला एकही विजय मिळवता आला नाहीये. यामुळे हार्दिकला चाहत्याच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सलग पराभवानंतर हार्दिक आता थेट देवा चरणी गेलाय. (Latest News)

पदरी नेहमीच निराशा येत असल्याने हार्दिकने आता देवांचा देव महादेवाला धावा केलाय. हार्दिकने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात जाऊन दुग्धाभिषेक करुन दर्शन घेतले. मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग तीन सामन्यांत हार पत्करावी लागलीय. रोहित शर्माकडून नेतृत्व हार्दिककडे दिल्याने आधीच नाराज असलेल्या चाहत्यांच्या रागात त्यामुळे भर पडलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रेक्षक हार्दिकला स्टेडियमवर टीका करत आहेत आणि त्यामुळे त्याचे मनोबल प्रत्यक्ष सामन्यात उतरण्यापूर्वीच खचत आहे. त्यातच, रोहित शर्माला हार्दिकने दिलेली वागणूक चाहत्यांना खटकल्याने सोशल मीडियातून हार्दिकला ट्रोलही करण्यात आलं. त्यामुळे मुंबई इंडियन्स, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा हेच यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात चर्चेत आहेत.

चाहत्यांकडून सतत होत असलेली टीका, पदरी पडणारी निराशा यामुळे हार्दिकचे मनोबल खचत आहे. आत्मविश्वास वाढवा यासाठी हार्दिकने महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली. हार्दिकने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दुग्धाभिषेक केला. पंडितजींनी मंत्रोच्चार करुन विधीवत पूजाही केली. यावेळी हार्दिकने सोमनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतलं. त्यामुळे हार्दिकचे मनोबल वाढून गमावलेला फॉर्म परत मिळेल, अशी आशा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आहे. सोमनाथ मंदिर ट्रस्टकडून हार्दिक पांड्याचा पूजा-अर्चना करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

या व्हिडिओमध्ये हार्दिकने कुर्ता-पायजमान परिधान केलेला दिसत आहे. दरम्यान, मुंबईने आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामना खेळला. या सामन्यात यजमानांना दारूण पराभव स्वीकारावा लागला. पण नाणेफेकीवेळी मुंबईचा कर्णधार हार्दिकला प्रेक्षकांनी डिवचलं होतं. तेव्हा प्रेंझेंटेटर संजय मांजरेकर यांनी हार्दिकला चीअर करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं, पण प्रेक्षकांनी दुर्लक्ष करत 'रोहित रोहित' अशा घोषणा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

Raj Thackarey News : हिंदुत्वाला तडा घालण्याचं काम शरद पवारांनी केलं; लालबागमधून राज ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Kolhapur News : नाशिकनंतर कोल्हापुरात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtrachi Hasya Jatra टीम झळकणार नवीन चित्रपटात, प्रसाद, सई, वनिताची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर, ‘गुलकंद चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT