Hardik Pandya became captain many people unfollowed the official page of Mumbai Indians Saam TV
Sports

Hardik Pandya: हार्दिक पंड्या कर्णधार बनताच मुंबई इंडियन्सचं मोठं नुकसान? फॉलोअर्सची संख्या झपाट्याने घटली!

Mumbai Indians News: हार्दिक पंड्या कर्णधार बनताच सोशल मीडियावर वादळ उठलं आहे. अनेक क्रीडाप्रेमींनी मुंबई इंडियन्सचं अधिकृत पेज अनफॉलो केल्याची माहिती आहे

Satish Daud

Hardik Pandya Latest News

आयपीएल 2024 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने सर्वांनाच धक्का देणारा निर्णय घेतला. संघाला ५ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माला बाजूला सारत मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार बनवलं.

टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर मुंबईच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवत संताप व्यक्त केला आहे. हार्दिक पंड्या कर्णधार बनताच सोशल मीडियावर वादळ उठलं आहे. अनेक क्रीडाप्रेमींनी मुंबई इंडियन्सचं अधिकृत पेज अनफॉलो केल्याची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर काहींनी यापुढे  मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सपोर्ट करणार नाही, अशी भूमिका देखील घेतली आहे. एका क्रीडावाहिनीच्या वृत्तानुसार, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवताच मुंबई इंडियन्सचे जवळपास ८ लाख फॉलोअर्स कमी झाल्याची माहिती आहे.

रोहितसारखा चाणाक्ष कर्णधार असताना हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्याची काय गरज पडली होती? असा प्रश्नही अनेकजण विचारत आहेत. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला (Hardik Pandya)  १५ कोटी रुपयांत विकत घेतलं होतं.

तेव्हापासून हार्दिक हा मुंबईचा नवा कर्णधार बनणार, अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. हार्दिक पंड्याने आयपीएलच्या दोन हंगामात गुजरात टायटन्स संघाची धुरा सांभाळली होती. त्याने संघाला पदार्पणातच चॅम्पियन बनवलं होतं. इतकंच नाही तर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवलं आहे.

हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात संघाने सातत्याने शानदार कामगिरी केली. त्याच्याकडे असलेले गुण लक्षात घेता टीम इंडियाने (Team India) टी-२० संघाचे कर्णधार बनवले. आता टीम तो आगामी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचं नेतृत्व करेल.

अशा स्थितीत टीम इंडियाची धुरा सांभाळणारा खेळाडू आपल्या संघाचा कर्णधार असावा, असं मुंबई इंडियन्सला वाटलं असेल, त्यामुळे त्यांनी हार्दिक पंड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवलं असावं.

रोहितने मुंबई इंडियन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवलं खरं, पण गेल्या तीन वर्षात मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वात बदल हवा, असे मुंबई इंडियन्सला वाटले असावं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT