ipl 2024 auctions  saam tv
Sports

IPL 2024 Auction: क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज! IPL 2024 स्पर्धेच्या लिलावाची तारीख ठरली? BCCI चा मोठा निर्णय

IPL 2024 Auction Date Update: आयपीएल स्पर्धेच्या लिलावाची तारीख ठरवण्याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.

Ankush Dhavre

BCCI On IPL 2024 Auction Date:

भारतीय संघासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचे असणार आहे. कारण या वर्षात भारतीय संघाला काही महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. ज्यात आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा समावेश आहे.

आशिया चषक स्पर्धचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. तर ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर reports स्पर्धेचा लिलाव सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांसोबत बोलताना म्हटले की, 'आता सध्या आमचं लक्ष वर्ल्डकप स्पर्धेवर आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर आम्ही आयपीएल स्पर्धेकडे वळू. वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर आम्ही आयपीएल स्पर्धेच्या लिलावाची तारीख ठरवणार आहोत.या लिलाव सोहळ्याचे आयोजन डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात केले जाऊ शकते. हा लिलाव ख्रिसमसच्या नंतर होण्याची दाट शक्यता आहे.आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तारीख ठरवू.' (Latest sports updates)

बीसीसीआयचा मोठा निर्णय..

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी फ्रेंचायजींना ९५ कोटी रुपयांऐवजी १०० कोटी रुपयांचा पर्स दिला जाणार आहे. (IPL Auctions)

आयपीएलच्या लिलावात सॅम करन, कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स आणि निकोलस पुरन यांच्यावर विक्रम १५ कोटींची बोली लागली आहे. तर हॅरी ब्रुकला सनरायझर्स हैदराबाद संघाने १३ कोटींची बोली लावत संघात स्थान दिले होते. (IPL 2024 Auction)

आयपीएल स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. त्यामुळे लिलाव सोहळ्याचं आयोजन देखील मोठ्या स्तरावर केलं जातं. या लिलाव सोहळ्याचे आयोजन डिसेंबरमध्येच केले जाणार मात्र ख्रिसमसच्या जवळपासची तारीख ठरवली जाणार नाही.

यामागचं प्रमुख कारण म्हणजे ख्रिसमसच्या वेळी सुट्ट्या असतात. त्यामुळे हॉटेल बुकिंग करणं कठीण होऊन जातं. आयपीएल लिलाव सोहळ्याचे आयोजन कुठे होणार याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही.

मात्र माध्यमातील वृत्तानुसार, मुंबई, जयपूर, कोच्ची, अहमदाबाद आणि कोलकाता यापैकी एका शहरात लिलाव सोहळ्याचे आयोजन केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! मुंबईतील समुद्रात चार महिन्यात २४ वेळा भरती; उसळणार साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा, हवामान विभागाचा अलर्ट

भवानीच्या दर्शनासाठी भाविकांची लूट; बोगस पुजारी आणि एजंटांचा भाविकांना गंडा

Iran-America War: इराण-अमेरिकेतील संघर्ष पुन्हा पेटला, इराणचा कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ला

कर्नाटकमध्ये मोठी राजकीय फेरबदल; काँग्रेसनं बदलला प्रदेशाध्यक्ष

Maharashtra News Live Update: - शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खरेदी केंद्र नसलेल्या तालुक्यात नाफेड थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करणार

SCROLL FOR NEXT