ipl trophy  google
Sports

IPL 2024 Auction: मोठी बातमी! लिलावाच्या काही तासांपूर्वीच ३ स्टार खेळाडूंनी आपलं नाव घेतलं मागे; कारणंही आलं समोर

IPL 2024 Auction News: लिलाव सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच ३ खेळाडूंनी आपली नावं लिलावातून मागे घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

Ankush Dhavre

IPL 2024 Auction Latest Updates:

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आज दुबईत पार पडणार आहे. स्थानिक वेळेनुसार हा लिलाव सकाळी ११:३० तर भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल. या लिलावात ३३३ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. दरम्यान लिलाव सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच ३ खेळाडूंनी आपली नावं लिलावातून मागे घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम यांनी लिलाव सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच लिलावातून आपलं नाव मागे घेतलं आहे. या दोघांसह इंग्लंडचा स्टार फिरकीपटू रेहान अहमदने देखील आपलं नाव मागे घेतलं आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि पाकिस्तानचा २२ मे ते ३० मे दरम्यान मायदेशात पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी त्याने आपलं नाव मागे घेतलं आहे. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डने स्पष्ट केलं आहे की, इंग्लंडचे खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी उपलब्ध असतील. इंग्लंड संघाकडून फिल सॉल्ट, ख्रिस वोक्स, हॅरी ब्रुक आणि आदील राशिद यांनी या लिलावात सहभाग घेतला आहे. (Latest sports updates)

बांगलादेशी खेळाडूंनी नाव मागे घेण्याचं कारण काय?

रेहान अहमदसह बांगलादेशी गोलंदाज शौरीफुल इस्लाम आणि तस्किन अहमद यांनी आयपीएल लिलावातून नावं मागे घेतली आहे. यामागचं कारण असं की, मार्च आणि एप्रिल महिन्यात बांगलादेशचा संघ मायदेशात श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हेच कारण आहे की त्यांनी या लिलावातून आपलं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्यांदाच असं घडणार..

आयपीएल स्पर्धेला २००८ मध्ये प्रारंभ झाला होता. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत आयपीएलचा लिलावाचे आयोजन कधीच भारताबाहेर झाले नव्हते. मात्र पहिल्यांदाच या लिलावाचे आयोजन दुबईत केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT