Andre Russell  x
Sports

Russell Insta Post: 'माही..माही..' प्रेक्षकांचा आवाज ऐकून भारावला रसेल; म्हणाला, 'हा व्यक्ती साऱ्या जगाचा...'

Andre Russell Post Ms Dhoni : भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी याची क्रेझ खूप आहे. धोनी भारतीय क्रिकेट संघात नसला तरी त्याचे चाहते त्याला क्रिकेट स्टेडियमवर पाहण्यासाठी उत्सुक असतात. प्रेक्षकांमध्ये धोनीची असलेली क्रेझ पाहून आंद्रे रसेल चकित झाला. रसेल त्यांचा एक अनुभव शेअर केलाय, काय आहे त्याचा अनुभव जाणून घेऊ

Bharat Jadhav

IPL 2024 Andre Russell Instagram Post On MS Dhoni :

क्रिकेट चाहत्यांचं माही प्रेम आपण नेहमीचं अनुभवलं असेल. महेंद्रसिंग धोनी जरी भारतीय क्रिकेट संघात नसला तरी प्रेक्षक त्याला विसरले नाहीत. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते काही करण्यास तयार असतात. धोनीविषयी चाहतं असलेलं इतकं प्रेम पाहून वेस्ट इंडिजचा खेळाडू देखील भारावलाय. त्याने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्याने धोनीच्या प्रेमाचं वर्णन केलंय.

भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी याची क्रेझ खूप आहे. धोनी भारतीय क्रिकेट संघात नसला तरी त्याचे चाहते त्याला क्रिकेट स्टेडियमवर पाहण्यासाठी उत्सुक असतात. चाहत्यांच्या हट्टापोटीच धोनी परत आयपीएलच्या स्पर्धेत गोलंदाजांची धुलाई करताना दिसतोय. एमएस धोनीचा किती मोठा चाहता वर्ग आहे याची प्रचिती प्रत्येक भारतीय व्यक्तीला आहेच. त्याच्या या क्रेझची प्रचिती वेस्ट इंडिजच्या खेळाडूला आली.

कोलकाता नाइय रायडर्स आणि सीएसके म्हणजे चेन्नई सुपर किंग्स संघात झालेल्या सामन्यात धोनी ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्यावेळी तो प्रेक्षकांनी त्यांच्या नावाचे नारे ऐकून केकेआर संघाकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा खेळाडू आंद्रे रसेलला याची प्रचिती आली. प्रेक्षकांकडून केला जाणारा धोनी-धोनी नावाचा जाप त्याच्या कानाने त्याने ऐकला होता.

एखाद्या खेळाडूच्या नावाचा इतका जाप केलं जाणं अंगावर शहारे आणणारे होते. याचा अनुभव टीव्ही सामना पाहणाऱ्यांना देखील आला होता. हा नजारा आपल्याला चेपॉक येथे झालेल्या सीएसके आणि केकेआरच्या सामन्यावेळी पाहिला मिळाला. एमएस धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा प्रेक्षकांनी धोनी - धोनी, माही-माही नावाचा जाप सुरू केला होता. हा आवाज इतका मोठा होता अनेकांना त्यांचे कान बंद करावे लागले होते. परंतु महेंद्रसिंग धोनीची इतकी क्रेझपाहून केकेआरचा ऑलराउंडर खेळाजू आंद्रे रसेल भारावला.

जेव्हा एमएस धोनी केकेआरविरुद्ध फलंदाजी करायला मैदानात आला, तेव्हा चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 3 धावांची गरज होती. धोनी ड्रेसिंग रूममधून बाहेर येताच चेपॉकच्या मैदानावर मोठा आवाज झाला. मैदानात धोनी-धोनीचे नारे लागले. चाहत्यांचा गोंगाट इतका मोठा होता की सीमारेषेवर उभ्या असलेल्या आंद्रे रसेलला दोन्ही कानांवर हात ठेवावे लागले.

एमएस धोनीची अशी क्रेझ पाहून खेळाडू रसेल चकित झाला. माहीच्या या क्रेझवरून रसेलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर माहीचे कौतुक केले आहे. धोनीसोबतचा फोटो शेअर करताना रसेलने लिहिले की, "मला वाटते की हा माणूस जगातील सर्वात प्रिय क्रिकेटर आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT